Kalyan singh Passes Away : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळपासून त्यांचा रक्तदाब कमी होत होता. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं शनिवारी निधन झालं.

Kalyan singh Passes Away : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 10:41 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळपासून कल्याण सिंह यांचा रक्तदाब कमी होत होता. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं शनिवारी निधन झालं. त्यांना लघवीलाही त्रास होत होता. त्यामुळे त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आलं होतं. लखनऊ पीजीआयचे डायरेक्टलर आर. के. धीमन यांनी आज सकाळीच सांगितलं होतं की, त्यांची प्रकृती नाजूक आहे. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. (Former Uttar Pradesh CM kalyan singh passed away)

4 जुलैला कल्याण सिंह यांना लखनऊच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातून पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. आयसीयूमध्ये चार दिवस उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा नव्हती. 17 जुलैला अचानक श्वास घेण्यास अडचण येऊ लागल्यामुळे त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.

27 जूनला पॅरोटेड ग्लँडमध्ये संसर्ग

कल्याण सिंह प्रकृतीच्या अनेक समस्यांचा सामना करत होते. 27 जून रोजी पॅरोटेड ग्लँडमध्ये संसर्घ झाल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तिथे त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात नेण्यात आलं. कल्याण सिंह यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आजही दिल्लीनंतर योगी आदित्यनाथ थेट रुग्णालयात पोहोचले होते. तसंच ते सातत्याने डॉक्टरांचा संपर्कात होते.

उत्तर प्रदेशातील भाजपचे हिंदूहृदय सम्राट

कल्याण सिंह यांना भाजपचे उत्तर प्रदेशातील हिंदूहृदय सम्राट म्हणून ओळखले जाते. हजारो कारसेवकांनी जेव्हा बाबरी मशिदीची इमारत पाडली तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र, मशीद पाडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला होता. सिंह यांनी 6 डिसेंबरच्या मेळाव्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर केले होते, त्यात असे म्हटले होते की, मशीदीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, आमचं सरकार मशिदीची पूर्ण काळजी घेईल. तथापि, तसे होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की, बाबरी विध्वंस प्रकरणात कल्याणसिंह यांची पडद्यामागे मोठी भूमिका होती आणि सर्व काही त्यांच्या संमतीने घडत होते. कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, परंतु या प्रकरणामुळे ते भाजपच्या सक्रीय राजकारणापासून दूर फेकले गेले. भाजपच्या या ‘हिंदूहृदय सम्राटा’ने यूपीमध्ये पक्षाला मोठी ओळख मिळवून दिली होती. पुढे पक्षाने त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते.

इतर बातम्या : 

संजय राठोड यांना शरीरसुख आरोप प्रकरणात क्लीनचीट, पण मधल्या दिवसांत बऱ्याच गोष्टी घडल्या ? चित्रा वाघ म्हणतात…

रक्तानं लिहिलेल्या पत्राद्वारे कार्यकर्त्याच्या अजित पवारांना शुभेच्छा! सच्च्या कार्यकर्त्याला अजितदादांचाही प्रेमाचा सल्ला

Former Uttar Pradesh CM kalyan singh passed away

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.