परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, गृहमंत्री देशमुखांच्या घरातील सीसीटीव्ही तपासा!
आता सत्ताधाऱ्यांनी सिंग यांच्यावर उलट आरोप करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत आता सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रा लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप सिंग यांनी केलाय. या पत्रावरुन आता सत्ताधाऱ्यांनी सिंग यांच्यावर उलट आरोप करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत आता सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.(Former Mumbai CP Parambir Singh’s petition in the Supreme Court)
परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
BREAKING: Former Police Commissioner @MumbaiPolice Parambir Singh moves #SupremeCourt seeking probe into allegations made by him in his letter to CM Uddhav Thackeray @CMOMaharashtra. Plea was filed today
Senior Advocate Mukul Rohatgi to appear for Singh pic.twitter.com/VwGKBKV3XB
— Bar & Bench (@barandbench) March 22, 2021
परमबीर सिंग यांनी पदावर असताना आरोप का केला नाही. त्यांची उचलबांगडी झाल्यावरच त्यांनी हे आरोप का केले? परमबीर सिंग यांचं पत्र म्हणजे भाजपची स्क्रिप्ट असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपानंतर सिंग यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. आपण केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेत नेमकं काय?
परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय, “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणतीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे.
अनिल देशमुखांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं.
त्यापूर्वी 24 की 25 ऑगस्ट 2020 मध्ये , रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त आहेत, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं.
मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते, असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राची चिरफाड करताना, शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी परमबीर सिंगांच्या पत्राचा दाखला दिला.
परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल पवारांनी केला.
मग हे अनिल देशमुख कोण?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सुरक्षारक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Shri Sharad Pawar ji said, from 15th to 27th February HM Anil Deshmukh was in home quarantine. But actually along with security guards & media he was seen taking press conference! https://t.co/r09U8MZW2m
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 22, 2021
संबंधित बातम्या :
मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार
मुंबई पोलीस आयुक्त राजभवनात, हेमंत नगराळेंची राज्यपाल कोश्यारींशी चर्चा
Former Mumbai CP Parambir Singh’s petition in the Supreme Court