माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन
तब्बल तीन दशके भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. | Karuna Shukla passed away

रायपूर: देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला (Karuna Shukla) यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगढच्या रामकृष्ण केअर या रुग्णालयात करुणा शुक्ला यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे करुणा शुक्ला भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. (Senior Congress leader and former MP Karuna Shukla passed away)
Senior Congress leader and former MP Karuna Shukla passed away last night at a hospital in Chhattisgarh where she was under treatment for #COVID19. She was also the niece of former PM, late Atal Bihari Vajpayee.
(File photo) pic.twitter.com/bFpoLKV7KD
— ANI (@ANI) April 27, 2021
करुणा शुक्ला यांच्या निधनानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. माझी काकी करुणा शुक्ला या आपल्यामध्ये राहिल्या नाहीत. निष्ठूर कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावले. राजकारणापलीकडे आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि आम्हाला त्यांचा विरह सहन करण्याची ताकद देवो, असे ट्विट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.
रमण सिंहांना कडवी टक्कर देणाऱ्या नेत्या
छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते यांना 2018 च्या विधानसभा निवडणुकीत करुणा शुक्ला यांनी कडवी टक्कर दिली होती. राजनांदगांव मतदारसंघात ही लढत रंगली होती. या निवडणुकीत करुणा शुक्ला यांचा पराभव झाला असला तरी रमण सिंह यांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. तब्बल तीन दशके भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
संबंधित बातम्या:
Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर
मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक
(Senior Congress leader and former MP Karuna Shukla passed away)
