AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरियाणा करनालमध्ये चार संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला येणार होते

पकडलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचे वय सुमारे 20-25 वर्षे आहे. चारही संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते. हे लोक हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

हरियाणा करनालमध्ये चार संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात, पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला येणार होते
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 05, 2022 | 2:37 PM
Share

हरियाणा – हरियाणा (Hariyana) करनाल (Karnaal) मधून 4 संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. तसेच चार जणांकडून पोलिसांनी हत्यार हस्तगत केली आहेत. ते पंजाबमधून दिल्लीत प्रवास करत होते. त्यांना संशयित दहशतवादी म्हणून ताब्यात घेतलं आहे. हरियाणातील करनालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळ्यांसह अनेक स्फोटक वस्तू मिळाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेली एक पावडर आरडीएक्स असू शकते अशी शंका आहे.

नेमकं काय घडलं

हरियाणातील करनालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि गनपावडरचे कंटेनर मिळाल्याची चर्चा आहे. ही गनपावडर आरडीएक्स असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यांच्याकडे एवढ्या गोळ्या आणि गनपावडर मिळाले आहेत की, ताब्यात घेतलेल्या चौघांनी मोठी दुर्घटना घडवून आणली असती. हे चौघेही पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी आयबी पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली केली आहे.

संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते

पकडलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचे वय सुमारे 20-25 वर्षे आहे. चारही संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते. हे लोक हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंडा हा वॉन्टेड दहशतवादी असून तो सध्या पाकिस्तानात लपला आहे. कर्नाल येथील बस्तारा टोलनाक्यावरून एक इनोव्हा वाहन पोलिसांच्या पथकाने पकडली त्यावेळी चार जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या ही गाडी मधुबन पोलीस ठाण्यात उभी आहे. तेथे बॉम्बशोधक पथक आहे. वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले आहेत. संशयित दहशतवाद्यांकडून शस्त्रे, मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि गनपावडरचे कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.