Hathras Stampede: आधी पोलिसात नोकरी आता…, ज्या बाबाच्या सत्संगला गेलेल्या 116 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला त्याची कहाणी
स्वयंघोषित संत साकार विश्व हरि भोले बाबा हे 26 वर्षांपूर्वी पोलीस विभागात शिपाई पदावर तैनात होते. पण अचानक त्यांनी पटियाली गावातील बहादुरीनगर येथे आपल्या झोपडीत सत्संगची सुरुवात केली. कुणा एकासोबत बातचित करताना भोले बाबाने दावा केला होता की, त्यांचा कुणी गुरु नाही. सलग 18 वर्षे पोलिसात काम केल्यानंतर त्यांनी इच्छा निवृत्ती घेतली. त्यांना परात्माचा साक्षात्कार झाला. अध्यात्माशी जास्त जवळ गेल्यानंतर त्यांनी सत्संग सुरु केलं.
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. हाथरस शहरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या फुलराई गावात साकार विश्व हरि भोले बाबा यांच्या सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जवळपास सव्वा लाख भाविक आले होते. याच सत्संगच्या कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेनंतर मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करणारे भोले बाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भोले बाबा कधी एकेकाळी पोलीस खात्यात नोकरी करायचे. आता ते स्वत:ला परात्माचा चौकीदार असल्याचं सांगतात. तर त्यांच्या असंख्य भक्तांचं म्हणणं आहे की, भोले बाबा हे देवाचे अवतारच आहेत. या भोले बाबांनी कासगंज जिल्ह्यातील पटियाला येथील एका छोट्या घरातून सत्संगची सुरुवात केली होती. आता या भोले बाबांचा प्रभाव हा पश्चिम युपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत आहे.
स्वयंघोषित संत साकार विश्व हरि भोले बाबा हे 26 वर्षांपूर्वी पोलीस विभागात शिपाई पदावर तैनात होते. पण अचानक त्यांनी पटियाली गावातील बहादुरीनगर येथे आपल्या झोपडीत सत्संगची सुरुवात केली. कुणा एकासोबत बातचित करताना भोले बाबाने दावा केला होता की, त्यांचा कुणी गुरु नाही. सलग 18 वर्षे पोलिसात काम केल्यानंतर त्यांनी इच्छा निवृत्ती घेतली. त्यांना परात्माचा साक्षात्कार झाला. अध्यात्माशी जास्त जवळ गेल्यानंतर त्यांनी सत्संग सुरु केलं. या स्वयंघोषित संताने आपल्या झोपडीपासूनच सत्संगला सुरुवात केली. हळूहळू अनेक लोक या विश्व हरिच्या प्रभावाखाली येऊ लागली. आता तर या विश्व हरिचा दरबार अनेक एकर जमिनीत भरवले जातात.
पटियाली तालुक्यातील बहादुरनगरही गावातून निघालेल्या भोले बाबाचा प्रभाव अनेक ठिकाणी पडला आहे. एटा, आगरा, मैनपुरी, शाहजहांपूर, हाथरससह अनेक जिल्ह्यांमध्ये या स्वयंघोषित भोले बाबाने आपलं वर्चस्व आणि प्रभाव निर्माण झालाय. याशिवाय मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये देखील या भोले बाबाचा चांगला प्रभाव आहे. भोला बाबाच्या भक्तांमध्ये सर्वाधिक नागरीक हे जाटव-वाल्मिकी आणि इतर मागासवर्गीय जातींचे गरीब नागरीक आहेत. त्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. भोला बाबाच्या स्वत:ला देवाचे सेवक मानतात. पण त्यांचे भक्त त्यांना देवाचा अवतार मानतात.
भक्तांना वाटलं जातं पाणी
भोले बाबाच्या सत्संगला जे लोक जातात त्यांना प्रसाद म्हणून पाणी दिलं जातं. बाबाच्या अनुयायांचं म्हणणं आहे की, पाणी पिल्याने त्यांच्या सर्व समस्या दूर होतात. अनेक जण हे पाणी बाटलीत भरुन सोबतही घेऊन जातात. बाबाचं बहादूरनगरी गावात असलेल्या आश्रममध्ये दरबार भरवला जातो. इथे आश्रमच्या बाहेर हँडपंप असतो. तिथेदेखील हँडपंपचं पाणी पिण्यासाठी मोठी लाईन लागते. दरम्यान, भोले बाबाच्या अनुयायांकडून कार्यक्रमाच्यावेळी रस्त्यांवर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढाकाराने काम केलं जातं. भाविकांना त्यांच्याकडून मार्गदर्शन केलं जातं. ड्रम भरुन रस्त्यांवर पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते.
आसाराम बापूचं प्रकरण समोर आल्यानंतर भोले बाबाने मीडियापासून दुरावा निर्माण केला होता. त्यावेळी बाबा आपल्या समर्थकांनाही फोटो काढण्यास मनाई करायचे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या सुरक्षेतील महिला कमांडोदेखील काढून टाकले होते. त्यांनी 2014 मध्ये एका प्रवचनात आसाराम बापूचा उल्लेखही केला होता. मीडियाने आसारामला बदनाम केलं आहे, असं भोले बाबा म्हणाले होते. या भोले बाबाच्या सत्संगला उत्तर प्रदेशच्या राजकारणातील मोठमोठे नेते हजेरी लावतात. फक्त उत्तर प्रदेशच नाही तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मोठमोठे नेते इथे येतात.