ज्या बागेने प्रेम, शांतता, प्रसन्नता दिली, त्याच बागेच्या कुशीत आता अंत्यविधी, राजधानी दिल्लीतील भयान वास्तव

संपूर्ण देश आज या कोरोना महामारीच्या संकटाशी झुंजत आहे. राजधानी दिल्लीत तर परिस्थिती प्रचंड भयानक होत चालली आहे (Funeral at garden on deceased in Delhi)

ज्या बागेने प्रेम, शांतता, प्रसन्नता दिली, त्याच बागेच्या कुशीत आता अंत्यविधी, राजधानी दिल्लीतील भयान वास्तव
राजधानी दिल्लीतील सुन्न करणारी परिस्थिती, मृतकांवर आता बागेत अंत्यविधी
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 6:50 PM

नवी दिल्ली : संपूर्ण देश आज या कोरोना महामारीच्या संकटाशी झुंजत आहे. राजधानी दिल्लीत तर परिस्थिती प्रचंड भयानक होत चालली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अनेकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होतोय. रुग्णांना घेऊन नातेवाईक या रुग्णालयापासून त्या रुग्णालयाच्या दारावर वणवण फिरत आहेत. या भयानक परिस्थितीत मृतांचा आकडा वाढत असल्याने आता स्मशानभूमीतही अत्यंविधीसाठी मोठी रांग लागल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील सलाय काले खां परिसरात प्रशासनाने बागेत मृतकांवर अंत्यविधी करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी बागेत युद्ध पातळीवर बांधकाम सुरु करण्यात आलं आहे (Funeral at garden on deceased in Delhi).

स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी मृतांची अक्षरक्ष: रांग

दिल्लीच्या सराय काले खां या परिसरात स्मशानभूमी नाही, असं नाही. तिथे स्मशानभूमी देखील आहेत. पण मृतांचा आकडा इतक्या प्रमाणात वाढतोय की स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी मृतांची अक्षरक्ष: रांग लागली आहे. मृतांच्या नातेवाईकांना तासंतास अत्यंविधीसाठी वाट पाहावी लागत आहे. या भयान परिस्थिवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला अखेर बागेत स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे (Funeral at garden on deceased in Delhi).

सराय काले खां या परिसरातील बागेत आता मृतकांवर अंत्यविधी

सराय काले खां या परिसरातील बागेत आता मृतकांवर अंत्यविधी केला जाणार आहे. ज्या बागेने शेकडो लोकांच्या मनाला गारवा दिला, शांती, प्रसन्नता दिली, अनेकांना निरोगी वातावरण दिलं, लहान मुलांना खेळण्यासाठी, वयस्कर आणि तरुणांना गप्पा-गोष्टी करण्यासाठी तसं वातावरण दिलं आज त्याच बागेच्या कुशीत मृतदेहांवर अंत्यविधी केला जाणार आहे. या महामारीचं यापेक्षा आणखी भयानक वातवरण काय असेल?

बागेत अंत्यविधीसाठी 70 प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी बांधकाम सुरु

सराय काले खां येथील बागेत मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी सध्या 20 प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत. तर पार्कच्या दुसऱ्या बाजूला 50 प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत. प्लॅटफॉर्म तयार करण्याचं कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली. दररोज एवढे मृतदेह येत आहेत की स्मशानभूमी अपुरी पडत आहे. त्यामुळे इथे प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत. आता तर अंत्यविधीसाठी जागेसह लाकडंही कमी पडू लागली आहेत. परिस्थिती प्रचंड वाईट आहे, असं कंत्राटदाराने सांगितलं.

दिल्लीत शनिवारी 357 रुग्णांचा मृत्यू

दिल्लीत शनिवारी (24 एप्रिल) दिवसभरात तब्बल 357 रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीत आता दररोज शेकडो रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी अपुरी पडू लागल्या आहेत. दिल्लीत काल दिवसभरात तब्बल 24 हजार 103 रुग्ण आढळले होते. महाराष्ट्र पाठोपाठ आता दिल्लीतीलही परिस्थितीत हाताबाहेर जाताना दिसत आहे.

हेही वाचा : मुंबईत घरोघरी नाही, पण वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार: महापौर किशोरी पेडणेकर

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.