G 20 Summit : एका रात्रीच्या किरायासाठी मोजावे लागतील इतके लाख, अमेरिकन राष्टपती या हॉटेलमध्ये थांबणार

G 20 Summit : नवी दिल्लीत जी-20 संमेलन होत आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सह अनेक राष्ट्राध्यक्ष सहभागी होत आहे. राजधानीत विविध हॉटेलमध्ये या बड्या नेत्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बायडन ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहे, त्याच्या आलिशान सूटचे एका रात्रीचा किराया इतके लाख रुपये आहे.

G 20 Summit : एका रात्रीच्या किरायासाठी मोजावे लागतील इतके लाख, अमेरिकन राष्टपती या हॉटेलमध्ये थांबणार
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 2:59 PM

नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : दिल्लीत जी-20 (G 20 Summit) देशांचे शिखर संमेलन होत आहे. यामध्ये अमेरिका, जपान, चीन, रशिया, इंग्लंड, कॅनाडा आणि इतर अनेक देश सहभागी होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आज संध्याकाळी नवी दिल्लीत पोहचणार आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था दिल्लीतील सर्वात आलिशान हॉटेल आयटीसी मौर्यामध्ये (ITC Maurya Chanakya Suite) करण्यात आली आहे. अमेरिकन राष्टपती जो बायडेन हॉटेल चाणक्यमधील आलिशान सूटमध्ये थांबतील. हा सूट 2007 मध्ये तयार करण्यात आला होता. या सूटमध्ये जगातील अनेक दिग्गज नेते थांबलेले आहेत. जगातील बड्या नेत्यांसाठी हा खास सूट तयार करण्यात आलेला आहे. या सूटचे एका रात्रीचे भाडे इतके लाख रुपये आहे. दिल्लीत दोन दिवस जगभरातील दिग्गज नेते येणार असल्याने सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे.

भारताची झलक

हा सूट भारतीय कलाकुसरने सजविण्यात आला आहे. या सूटमध्ये लिव्हिंग रुम, स्टडी, खासगी डायनिंग रुम, मिनी स्पा आणि जिमची सुविधा आहे. हा सूट एखाद्या आलिशान राजवाड्यासारखा आहे. त्याचे महाद्वार खास आकर्षणाचे केंद्र आहे. या सूटच्या एका बाजूला आर्य चाणक्यची एक खास मूर्ती ठेवण्यात आली आहे. या सूटमध्ये मास्टर बेडरुम, स्टीम रुम, गेस्ट रुम आणि अनेक सुविधा आहेत. सूटमध्ये जागोजागी सोने-चांदीच्या फुलदाणीत ताजे विविधरंगी फुल ठेवण्यात येतात. या रुममध्ये इतरही अनेक सुविधा आहेत.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन राष्ट्रपतींचे आवडते ठिकाण

एका वृत्तानुसार, आयटीसी मौर्यामध्ये अमेरिकन डेलिगेशनसाठी 400 हून अधिक रुम बूक करण्यात आल्या आहेत. हॉटेल एखाद्या आलिशान महलासारखे आहे. यामधील ग्रँड प्रेसिडेंशिअल सूटमध्ये अमेरिकन राष्ट्रपती थांबतील. दुसऱ्या खोल्यांमध्ये त्यांचे अधिकारी थांबतील. ज्या सूटमध्ये राष्ट्राध्यक्ष थांबणार आहेत, तो एकदम खास आहे. हे हॉटेल अमेरिकन राष्ट्रपतींचे सर्वात आवडते ठिकाण आहे.

​खास सूटची व्यवस्था

प्रेसिडेंशिअल सूट, हॉटेलच्या 14 व्या मजल्यावर आहे. त्याचे नाव चाणक्य सूट आहे. हा सूट 2007 मध्ये तयार करण्यात आला आहे. या सूटमध्ये यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते. हा सूट 4600 चौरस फुटावर आहे. . याठिकाणी यापूर्वी जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामा आणि डॉनल्ड ट्रम्प थांबलेले आहेत.

का ठेवले हे नाव

भारताचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि त्याचे मार्गदर्शक कुटनितीज्ञ, अर्थशास्त्री चाणक्य यांच्या नावावरुन या सूटचे नाव ठेवण्यात आले आहे. या सूटची अद्भूत सजावट आणि डिझाईनसाठी हा सूट ओळखण्यात येतो. या सूटमध्ये अत्यंत दुर्लभ कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सूटमुळे प्राचीन भारताची ओळख परदेशी पाहुण्यांना समजते.

किती आहे भाडे

आयटीसी मौर्यच्या चाणक्य सूटचे भाडे किती आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. मीडिया रिपोर्टनुसार चाणक्य सूटचे एका रात्रीचे भाडे 10 लाख रुपयांच्या घरात आहे. बायडन यांना 14 व्या मजल्यावर पोहचण्यासाठी खास लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. या लिफ्टच्या मदतीने ते थेट त्यांच्या सूटमध्ये पोहचतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.