G20 New Delhi Summit 2023 : G20 परिषदेचा आज दुसरा दिवस; जगाच्या भवितव्यावर महामंथन
G20 New Delhi Summit 2023 : काल दोन सत्रात चर्चा आज 'वन फ्युचर'वर दीर्घ मंथन; G20 परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम कसा? वाचा सविस्तर...
G20 New Delhi Summit 2023 : भारतासाठी सध्याचा दिवस महत्वाचे आहेत. कारण G20 परिषद सध्या भारतात होत आहे. या परिषदेसाठी जगभरातील महत्वाचे नेते दिल्लीत आहेत. कालच्या दिवसात विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली असताना आज या परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी 8. 15 मिनिटांनी आजच्या दिवसाच्या घडामोडी घडायला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच हे सगळे नेते राज राजघाटावर येत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची संस्कृती दाखवत आहेत. त्यांना भारताचा वारसा दाखवत आहेत. यावेळी ते पीस वॉलवर सह्या करण्यात येत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धासुमन अर्पण करण्यात यतील. इथं भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
साडे नऊ वाजता हे नेते भारत मंडपम दाखल होतील. सव्वा दहा वाजता भारत मंडपमच्या जवळच साऊथ प्लाझामध्ये वृक्षारोपण होईल. पुढे साडे दहा वाजता भारतमंडपात वन फ्यूचरवर तिसरं सत्र पार पडेल. दुपारी साडे बारा वाजता द्विपक्षीय चर्चा होईल. नंतर हे नेते आपआपल्या देशात परतण्यासाठी निघतील.
बायडन आज मायदेशी परतणार
जो बायडन तिसऱ्या सत्रात सहभागी होणार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे G20 च्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात सहभागी होणार नाहीत. थोड्याच वेळात बायडन राजघाटावर महात्मा गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. राजघाटावर राष्ट्रपित्याला अभिवादन केल्यानंतर ते आज मायदेशी परतण्यासाठी प्रवास करण्यासाठी निघतील. दर्शन घेतल्यानंतर बायडल नवी दिल्ली विमानतळाकडे रवाना होणार आहेत. जी 20 च्या आजच्या तिसऱ्या सत्रात बायडन सहभागी होणार नाहीत.
भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील या परिषदेसाठी भारतात आले आहेत. ते सपत्नीक या परिषदेसाठी दाखल झालेत. ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मुर्ती दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी अक्षरधाम मंदिरात जलाभिषेक आणि पूजा केली. यावेळी मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.