AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जी 20 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची दिसली मैत्री !

इंडोनेशियातील बाली येथे जी20 परिषदेला आजपासून सुरुवात होणार आहे. सध्या या जी20 परिषदेचे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे असून जोको विडोडो अध्यक्ष आहेत. पुढील जी20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळण्याची शक्यता आहे.

जी 20 परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची दिसली मैत्री !
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 15, 2022 | 11:35 AM
Share

जी20 शिखर परिषद इंडोनेशिया येथील बाली येथे पार पडत आहे. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थिती लावणार असून त्यासाठी ते बाली येथे हजर झाले आहे. याच दरम्यान पहिलीच भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमिरेकचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली आहे. यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी आदराने गळाभेट करत एकमेकांचे हात हातात घेत भेट घेतली आहे. याबाबतचा फोटो पीएमओ कार्यालयाकडून ट्विटरवर शेयर करण्यात आले आहे. दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध आणि मैत्री किती घट्ट आहे यावरून अधोरेखित होत आहे. इंडोनेशिया येथील जी20 परिषदेत दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत आहे. यापूर्वी देखील दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर संपूर्ण जगभरात चर्चा होत असते. आत्ताही तशीच चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव हा जगभरात असल्याचे अनेकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केले असल्याने दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट जगभरात चर्चेचा विषय ठरत असते.

असं झालं स्वागत – इंडोनेशिया येथील बाली विमानतळावर भारताचे पंतप्रधान सोमवारी पोहचले होते, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले होते. यावेळी भारतीयांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही हस्तांदोलन करत स्वागत केले होते, तत्पूर्वी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी जगभरातून आलेल्या विविध देशांच्या प्रमुखांचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत केले आहे. आजपासून इंडोनेशियातील बाली येथे जी20 परिषदेला सुरुवात होणार आहे.

जी20 परिषदेचं अध्यक्षपद – इंडोनेशियातील बाली येथे जी20 परिषदेला आजपासून सुरुवात होणार आहे. सध्या या जी20 परिषदेचे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे असून जोको विडोडो अध्यक्ष आहेत. पुढील जी20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या जी20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्वाचा मानला जात असून मोदींच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. या जी20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार की नाही याबाबत साशंकता आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांचा जी20 परिषदेत सहभाग असणार आहे.

जी20 परिषदेत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा भारत आणि चीन या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली तर गलवान खोऱ्यातील मुद्द्यावर चर्चा होईल. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा होईल. ब्रिटनचे नवनियुक्त पंतप्रधान ऋषि सुनक यांच्याबरोबर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता असून भेटीचे कारण मात्र समोर आलेले नाही. जागतिक आर्थिक विकासावर चर्चा होणार आहे, अन्न आणि ऊर्जा यांसह ऊर्जा, आरोग्य आणि डिजिटल परिवर्तनाबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. कोरोना नंतर निर्माण झालेल्या समस्येवर देखील याबाबत चर्चा होणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.