भारताचे ‘गांडीव’ अस्र वायू सेनेत होणार दाखल,वैशिष्ट्ये इतकी अफाट की चीन आणि पाकिस्तानच्या उरात धडकी
गांडीव हे क्षेपणास्र आत्मनिर्भर भारतासाठी मोठे पाऊल ठरणार आहे. Livefist Defence.com च्या रिपोर्टमध्ये भारताच्या या मोठ्या अस्रासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Gandiv Astra Mk-III : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक शस्र गांडीव दाखल होत आहे. हे शस्र Mk-III मिसाईल, SFDR प्रणालीसह ३४० किमीपर्यंत हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. हे मिसाई शत्रूच्या फायटर जेटला दूरवरुनही ओळखून त्याला नष्ट करु शकते. चला तर पाहूयात या अत्याधुनिक क्षेपणास्राची माहीती पाहूयात….
भारताने हवेतून हवेत मारा करणारे मिसाईल ‘गांडीव’Astra Mk-III याच्या संशोधनास सुरुवात केली आहे. हे क्षेपणास्र शत्रूच्या लढावू विमानांना खूप अंतरावरूनही नष्ट करण्याची क्षमता राखून आहे.हे क्षेपणास्र भारताच्या हवाई हल्ल्याची रणनिती संपूर्णपणे बदलू शकते. या शस्राचे नाव महाभारतातील अर्जूनाच्या धनुष्यावरुन ठेवले आहे. लवकरच या क्षेपणास्राची चाचणी होऊ शकते. यापूर्वी याच्या दोन चाचण्या झाल्या आहेत.
गांडीव मिसाईलची वैशिष्ट्ये
Astra Mk-III, ज्याला गांडीव देखील म्हटले जाते. भारतात तयार झालेली ही अत्याधुनिक BVRAAM (Beyond Visual Range Air-to-Air Missile)मिसाईल यंत्रणा आहे. म्हणजे हे मिसाईल शत्रूच्या मिसाईलना न पाहाता नष्ट करु शकते. या क्षेपणास्रात एक खास खास SFDR (Solid Fuel Ducted Ramjet) सिस्टम लावली आहे.ज्यामुळे ते अधिक लाब आणि अधिक वेगाने जाऊ शकते. या मिसाईलची कमाल उंचीवर ३४० किमी तर ८ किमी उंचीवर १९० किमी पर्यंत टार्गेट नष्ट करु शकते.




गांडीवमुळे एयरफोर्सची ताकत वाढणार
या क्षेपणास्राची रेंज शत्रू देशांकडे असलेल्या बहुतांशी मिसाईलपेक्षा जास्त आहे. भारतीय वायुसेनेतील राफेलला लावलेल्या MBDA Meteor क्षेपणास्रापेक्षाही गांडिव क्षेणास्रापेक्षा जास्त आहे. गांडीव क्षेपणास्रांच्या समावेशाने भारतीय वायू सेनेती ताकद वाढणार आहे. गांडीव/Astra Mk-III ची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे शत्रूंच्या जेट फायटरना ३४० किमी अंतरावरून नष्ट करु शकते. एवढ्या मोठ्या अंतरावरही या मिसाईल पासून वाचण्याचा कोणताही पर्याय नाही.
चीन-पाकिस्तान दहशतीखाली
‘ गांडीव’ मिसाईल उंचावर देखील चांगली कामगिरी करते.८ किमी ऊंचीवर देखील हे क्षेपणास्र १९० किमीपर्यंत घातक वार करु शकते. त्यामुळे भारताचे पांरपारिक शत्रू असलेले पाकिस्तान आणि चीन देखील यापासून वाचू शकत नाही. राफेलला लावलेल्या MBDA Meteor मिसाईलपेक्षाही याची रेंजर अधिक आहे.
अर्जूनाच्या धनुष्याचे नाव गांडीव..
गांडीव मिसाईलचे नाव महाभारतातील युद्धात अर्जून यांच्या हातातीव गांडीव धनुष्यावरुन नाव पडले आहे.हे केवळ शत्रूंच्या मिसाईलच नाही तर AWACS, हवेत इंधन भरणारे विमान, पाचव्या पिढीचे लढावू विमान सारख्या लक्ष्यांना देखील ते नष्ट करु शकते. गांडीव मिसाईलचा फोटो .सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लवकरच त्याची चाचणी होणार असून सुखोई ( Su-30 MKI ) विमानाद्वापरे त्याची चाचणी होण्याची शक्यता आहे.