Delhi Crime: दिल्लीत आणखी एका महिलेवर गँगरेप; दोघा नराधमांना अटक

दोन दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी पहाटे 3 वाजता महिलेने अज्ञात व्यक्तीला तिच्या नातेवाइकाकडे नेण्यास सांगितले. पिडीत महिला त्या व्यक्तीसोबत सागरपूरहून कारमध्ये बसली होती. संबंधित कारमध्ये आणखी एक व्यक्ती होती. या दोघांनी महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

Delhi Crime: दिल्लीत आणखी एका महिलेवर गँगरेप; दोघा नराधमांना अटक
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:54 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दिल्लीतील आणखी एक महिला नराधमांच्या वासनेची शिकार ठरली आहे. पश्चिम दिल्लीच्या हरी नगर परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोघा नराधमांना अटक करण्यात यश मिळवले आहे. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. या घटनेने खळबळ उडाली असून परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार

दोन दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी पहाटे 3 वाजता महिलेने अज्ञात व्यक्तीला तिच्या नातेवाइकाकडे नेण्यास सांगितले. पिडीत महिला त्या व्यक्तीसोबत सागरपूरहून कारमध्ये बसली होती. संबंधित कारमध्ये आणखी एक व्यक्ती होती. या दोघांनी महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. घटनेबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलिस उपायुक्त (पश्चिम) प्रशांत गौतम यांनी सांगितले की, आरोपींनी निहाल विहार परिसरात निर्जन ठिकाणी कार थांबवली आणि त्यानंतर दोघांनी महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना ज्या कारमध्ये घडली, ती कार अनेक भागांतून गेल्याने पोलिसांच्या कार्यकक्षेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, लवकरच त्यावर तोडगा काढून पोलिस तपासाला गती देण्यात आली आणि दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आले.

जन्मदात्यानेच मुलीवर केला अत्याचार

बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये ही बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली. स्थानिक पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. घटनेनंतर आरोपी नराधम बाप फरार असल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलीच्या आईकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, मुलगी झोपली असताना तिच्या पतीने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपासाला वेग दिला आहे. पोलिसांनी नराधमाला वेळीच गजाआड करण्यासाठी पावले उचलली आहेत. आरोपीला वेळीच अटक करू, असा विश्वास स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

तक्रारदार महिलेने सांगितले की, माझ्या पतीने 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. हा अत्यंत लांच्छनास्पद प्रकार निदर्शनास आल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला. यावेळी मी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर माझा आवाज ऐकून नराधम बाप पळून गेला. याप्रकरणी पतीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलेने केली आहे. (Gangrape on a woman in Delhi, two accussed arrested)

इतर बातम्या

Accident | कंटेनर आणि ट्रॅव्हल्सची जोरदार धडक, 4 मृतांपैकी तिघांवर जागीच काळाचा घाला

Delhi Murder : इंस्टा पोस्टवरुन दिल्लीत 17 वर्षीय मुलाची हत्या, मुख्य आरोपी फरार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.