General Manoj Pandey : जनरल मनोज पांडे यांनी पदभार स्वीकारला, नरवणे यांची घेतली जागा, पत्नी मुलगा आणि सून ही आहे भारतीय वायू दलात
जनरल मनोज पांडे इथे अशा वेळी जबाबदारी सांभाळत होते, जेव्हा भारत सरकार सुरक्षेला घेऊन अलर्टवर आले होते. तर त्यावेळी पाय दल, नौदल आणि वायू दल यांच्या एकत्री करणार लक्ष दिलं जात होतं.
नवी दिल्ली : देशाला आज नवे लष्करप्रमुख (New Army Chief) मिळाले आहेत. भारतीय लष्कराचे अनुभवी आणि पराक्रमी अधिकारी जनरल मनोज पांडे यांनी आज लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी एमएम नरवणे यांची जागा घेतली आहे. ते देशाचे २९ वे लष्करप्रमुख बनले आहेत. ज्येष्ठता क्रमानुसार हे पद त्यांच्याकडे आलं आहे. तर विशेष बाब म्हणजे जनरल मनोज पांडे हे कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे (Corps of Engineers) पहिले अधिकारी आहेत, जे लष्करप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळतील. याच्याआधी ते २८ वेळा पाय दल, तोफखाना आणि आर्मर्ड रेजिमेंटच्या (Artillery) 13 लाख जवानांच्या सैन्याचे ते प्रमुख राहीले आहेत. तर लेफ्टनंट जनरल पांडे हे याच वर्षी १ फेब्रुवारीला ते भारतीय लष्कराचे उप-प्रमुख बनले होते. तर त्याच्याआधी त्यांनी पुर्व लष्कर कमानचे प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे.
पूर्व लष्कर कमानमध्ये सिक्कीम आणि अरूणाचाल प्रदेशमधील वास्तविक नियंत्रण रेषेचा समावेश होतो. ज्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. ते इथे अशा वेळी जबाबदारी सांभाळत होते, जेव्हा भारत सरकार सुरक्षेला घेऊन अलर्टवर आले होते. तर त्यावेळी पाय दल, नौदल आणि वायू दल यांच्या एकत्री करणार लक्ष दिलं जात होतं. त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल पांडे यांनी अंदमान आणि निकोबारचे प्रमुख म्हणूनही भूमिका बजावली आहे.
New Indian Army Chief Lt. Gen Manoj Pandey takes the charge. pic.twitter.com/xTYV7dr2Ed
— Koustuv ?? ? (@srdmk01) April 30, 2022
पत्नीबरोबर राष्ट्रपतींची भेट
माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी आपल्या पत्नी वीना नरवणेंसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यांची भेट घेतली.
General Manoj Mukund Naravane, Chief of the Army Staff, along with his wife Veena Naravane, called on President Ram Nath Kovind and First Lady Savita Kovind at Rashtrapati Bhavan
(Source: Rashtrapati Bhawan) pic.twitter.com/FL3fVSkLpc
— ANI (@ANI) April 30, 2022
राष्ट्रीय रक्षा अकादमी
जनरल मनोज पांडे नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी राहीले आहेत. जनरल मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये बॉम्बे सॅपर्स, कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ठिकाणी सेवा दिल्या. तर अनेक दहशवाद्याविरोधातील कारवाईत भाग घेतला. त जम्मू आणि काश्मीर येथे ऑपरेशन पराक्रम वेळी नियंत्रण रेषे जवळ एका इंजीनिअर रेजिमेंटचे नेतृत्व त्यांनी केलं आहे. तर त्यांना प. लदाखमधील पर्वतीय भागातील कामाचा ही अनुभव आहे. त्यांचे हेच अनुभव देशाच्या सुरक्षतेत महत्वाची भूमिका बजावेल
एम एम नरवणे यांनी केले ट्विट
Wonderful meeting with Army Chief,Gen MM Naravane, who’s retiring today after serving the nation for 42 yrs. His contributions as a military leader has strengthened India’s defence capabilities & preparedness. I wish him success in his future endeavours, tweets Defence Minister pic.twitter.com/AI8aj8sXOk
— ANI (@ANI) April 30, 2022
इथोपिया आणि इरिट्रिया मध्येही महत्वाची भूमिका
त्यांनी इथोपिया आणि इरिट्रिया येथे संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य इंजिनीअरच्या स्वरूपात काम केलं आहे. तर लष्कराच्या मुख्यालयात अतिरिक्त महानिदेशक आणि दक्षिण कमान मधील मुख्यालायात चिफ ऑफ स्टाफ म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या याच सेवांसाठी परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक लष्कर प्रमुख प्रशिस्तीपत्र असे सन्मान मिळाले आहेत.
जरनल पांडे हे नागपूरचे असून त्यांच्या बाबतीत त्यांचे लहानपणीचे मित्र दिलीप आठवले सांगतात, जरनर पांडे यांचे वडिल हे नागपूर विद्यापीठात मनोविज्ञान चे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. त्यांची आई प्रेमा पांडे या ऑल इंडिया रेडिओ मध्ये अनाउंसर होत्या. तर त्या त्यावेळी मधु मालती हा कार्यक्रम करत असत. तर विशेष बाब म्हणजे जनरल पांडे यांच्या पत्नी अर्चना ज्या दंतचिकीस्तक आहेत त्या आणि त्यांचा मुलगा आणि सून या भारतीय वायू दलात पायलट म्हणून आहेत.