महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाखांचे बक्षीस मिळवा, धक्कादायक योजनेचा सूत्रधार अटकेत

लोकांची फसवणुक करण्याबाबतची अनेक प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. पण हे प्रकरण काही वेगळेच आहे. सोशल मिडीयावर या प्रकरणाने बरच धुमाकूळ घातला होता. हे प्रकरण आहे महिलांना प्रेग्नंट करण्याचे.

महिलेला प्रेग्नंट करा, 13 लाखांचे बक्षीस मिळवा, धक्कादायक योजनेचा सूत्रधार अटकेत
BIHAR CRIME NEWSImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 3:14 PM

बिहार | 1 जानेवारी 2024 : सोशल मिडीयावर अचानक काही महिला समोर आलेल्या दिसल्या. या महिला त्याचे पती, सासू, आई यांच्यासमोर मला जो पुरुष संतती देईल त्यांना गाडी, बंगला, पैसा मिळेल असा आशयाचे व्हिडीओ बनवून सोशल माध्यमावर पोस्ट करत होत्या. अनेक महिला आपल्या गाडीतून, आलिशान बंगल्यातून असे व्हिडीओ बनवून पोस्ट करत होत्या. त्यांच्या या व्हिडीओला भुलून अनेक तरुण फसले गेले. अशातच एका कंपनीनेही जाहिरात करून भल्या मोठ्या रकमेचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बिहारमध्ये फसवणुकीचे हे अनोखे प्रकरण समोर आले आहे. ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी या नावाने कंपनी कडून त्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यात येत होती. या टोळीचा नवादा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोकांना फसवण्यासाठी या कंपनीने जी योजना तयार केली ती ही अनोखी अशीच आहे.

नवादा पोलिसांनी या टोळीतील 8 जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर समोर आलेली कहाणी ही अतिशय धक्कादायक आहे. ही टोळी ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब एजन्सी कशी काम करत होती?

फसवणूक करणाऱ्या टोळीने महिलांना गरोदर बनवायचे त्याबदल्यात पैसे कमावण्याची योजना चालवली होती. टोळीतील सदस्य लोकांना कॉल करायचे. आपली एजन्सी ज्यांना मुले होऊ शकत नाहीत अशा स्त्रियांसाठी काम करते असे हे एजंट सांगत असत. ती महिला जर गर्भवती राहिली तर तुम्हाला 13 लाख रुपयांचे बंपर बक्षीस दिले जाईल असेही हे एजंट सांगत असत. याच बंपर बक्षिसाला भुलून अनेक तरुण या योजनेतील फसवणुकीचे बळी होत असत.

एजंटने सांगितलेल्या बक्षिसाला भुलून एखादा तरुण सहमती देत असे. त्यावेळी हे एजंट त्याच्याकडून कंपनीत नाव नोंदणीच्या नावाखाली 799 इतकी रक्कम घेत असत. तर, सिक्युरिटी मनीच्या नावाखाली नोंदणी करणाऱ्यांकडून 5,000 ते 20,000 इतकी रक्कम जमा करायचे.

कंपनीचे एजंट फोनवर या गोष्टी सांगत तेव्हा लोक सहज फसत. एवढेच नाही तर गर्भधारणा झाली नाही तरी आम्ही ५ लाखांचे बक्षीस देऊ, असे आश्वासन देण्यात यायचे त्यामुळे लोक 799 रुपये भरून या योजनेचे बळी व्हायचे. मात्र, यातील एका पिडीताने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याची गंभीर दाखल घेत तपास सुरु केला. पोलिसांनी कंपनीचे एजंट आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार याच्यासह एकूण 8 जणांना अटक केली. त्यांच्यावर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.