थर्टी फर्स्टच्या चिकन बिर्यानीतून तरूणीचा मृत्यू
केरळातील एका 20 वर्षीय तरूणीचा चिकन बिर्यानीतून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे याआधी एका नर्सचाही अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात फूड पॉयझनने मृत्यू झाला होता.
केरळ : थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी ऑनलाईन (online ) मागविलेल्या चिकन बिर्यानीने (biryani) केरळातील ( keral) कासारागोड येथील थलकलयी गावातील एका तरूणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वी कोझीकोडे येथील कोट्टयम मेडीकल कॉलेजच्या एका नर्सचा अशाप्रकारे जेवणातून विषबाधा होऊन मृत्यू झाला होता.
अंजूश्री पार्वती (20 ) हीने अल रोमानसिया रेस्ट्रोरंटमधून चिकन ऑनलाईन बिर्यानी मागवली होती. हे अन्न खाल्ल्यानंतर तिच्या घरातील पाच सदस्यांना अस्वस्थ वाटू लागले. सात दिवसानंतर अंजूश्री हीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. तिची आई अंबिका, भाऊ श्रीकुमार ( 18 ), तिच्या 19 वर्षीय कझीन्स श्रीनंदना, अनुश्री यांना उलट्या आणि पोटदुखी सुरू झाली होती.
अंजुश्री हीची आई अंबिका आणि भाऊ यांच्या अजूनही पोटात दुखत असून तिचे इतर नातलग यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू अंजूश्रीला खूप उलट्या झाल्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, केरळाच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.