3 महिन्यांपासून ती रोज आईवडिलांना गुपचूप झोपेची गोळी द्यायची, नंतर बॉयफ्रेंडला… करामत ऐकून घरचेही…

आई-वडिलांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं, हे तर जगजाहीर आहे. पण काही वेळेस मुलं आई-वडिलांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ शकतात. आणि असं काही करून बसतात, ज्यामुळे सर्वांनाच त्रास होऊ शकतो.

3 महिन्यांपासून ती रोज आईवडिलांना गुपचूप झोपेची गोळी द्यायची, नंतर बॉयफ्रेंडला... करामत ऐकून घरचेही...
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 3:44 PM

गोरखपुर | 6 जानेवारी 2024 : आई-वडिलांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं, हे तर जगजाहीर आहे. पण काही वेळेस मुलं आई-वडिलांच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ शकतात. आणि असं काही करून बसतात, ज्यामुळे सर्वांनाच त्रास होऊ शकतो. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील तिवारीपूर पोलीस स्टेशनमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथे एक मुलगी गेल्या 3 महिन्यांपासून आई-वडिलांना जेवणासोबत झोपेच्या गोळ्या देत होती. आणि तिचे आई-वडील झोपले की ती तिच्या प्रियकराला घरी बोलवायची. मुलीच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी एक दिवस औषध घेतले नाही आणि चूपचाप झोपण्याचं नाटक केलं.

पण रात्री काही खुडबूड ऐकू यायला लागल्यावर मात्र ते उठले आणि समोर मुलीचा बॉयफ्रेंड दिसताच संतापले. त्यानंतर त्यांनी त्या बॉयफ्रेंडला पकडून बेदम मारहाण केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोकही तेथे गोळा झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवलं.

खरंतर, ही घटना तिवारीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अधियारी बाग परिसरात घडली. येथे दहावीच्या एका विद्यार्थिनीचे बिलंदपूर परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या तीन महिन्यांपासून ही मुलगी तिच्या आई-वडिलांना जेवणात झोपेच्या गोळ्या देऊन झोपवायची. यानंतर ती तिच्या प्रियकराला रात्री घरी बोलवत असे. परिसरातील लोकांना संशय आल्याने त्यांनी मुलीच्या पालकांना माहिती दिली.

असं पकडलं बॉयफ्रेंडला

यानंतर मुलीने पुन्हा झोपेच्या गोळ्या आई-वडिलांना दिल्या असता त्यांनी त्या खाल्ल्या नाहीत आणि ब्लँकेट पांघरून झोपण्याचे नाटक केले. यानंतर रात्री मुलीचा प्रियकर घरी येताच मुलीच्या वडिलांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही तेथे जमा झाले. यानंतर ही गोष्ट त्या तरुणाच्या कुटुंबीयांच्या कानावर घालण्यात आल्यावर तेही घटनास्थळी पोहोचले. आणि दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी दोन्ही पक्षांना शांत करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली.

त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरण जाणून घेत दोघांनाही शांत केलं आणि मध्यस्थी करून तो वाद मिटवला.अद्याप कोणत्याही पक्षाकडून तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलं.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.