Goa Assembly Election : तृणमूल काँग्रेसची मोठी घोषणा, गोव्याच्या मैदानात शड्डू ठोकणार!

तृणमूल काँग्रेसनं मोठी घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. कारण, गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस उतरणार आहे. तशी घोषणाच आज टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केलीय.

Goa Assembly Election : तृणमूल काँग्रेसची मोठी घोषणा, गोव्याच्या मैदानात शड्डू ठोकणार!
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:05 PM

मुंबई : पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहेत. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसनं मोठी घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. कारण, गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस उतरणार आहे. तशी घोषणाच आज टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केलीय. (Trinamool Congress to contest Goa Assembly elections)

गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आपले उमेदवार उतरवणार आहे. डेरेक ओ ब्रायन यांनी त्याबाबत शनिवारी घोषणा केली. तृणमूल काँग्रेस लवकरच आपला गोव्यातील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल. आम्ही गोव्यातील सत्ताधारी भाजपचे मोठे प्रतिस्पर्धी आहोत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील पक्षात कोणतीही एकाधिकार शाही नाही. त्या गोव्यात विश्वसनीय स्थानिक नेत्यांना मैदानात उतरवतील अशी माहितीही डेरेक ओ ब्रायन यांनी दिली आहे.

मोदींना ममता बॅनर्जीच टक्कर देऊ शकतात- ओ ब्रायन

शुक्रवारी गोव्यात पोहोचल्यानंतर ओ ब्रायन यांनी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. गोव्याला राज्यात अशा एका पक्षाची गरज आहे की, ती भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल. तसंच मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोणता नेता असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत. गोव्यात तृणमूल काँग्रेसमुळे विरोधी पक्षांच्या मतांमध्ये विभागणी होणार नाही, असा दावाही ओ ब्रायन यांनी यावेळी केला.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरो यांच्या नावाची चर्चा

काँग्रेस आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरो हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांनी स्वत: मात्र अशा बातम्यांचा इन्कार केलाय. मला कुणीही संपर्क केलेला नाही. जर मी असं काही पाऊल उचलेल तर आधी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करेल. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार एग्नेलो फर्नांडिस यांनी सांगितलं की, पक्षात मोठी नाराज आहे. त्यामुळे पक्षातील नेते टीएमसीसोबत जाण्याच्या अफवा पसरल्या आहेत.

काही पक्षात अराजकता, काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं – फडणवीस

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी 20 सप्टेंबर दरम्यान गोवा दौरा केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळीफडणवीसांसोबत गोव्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. काँग्रेससमोर अस्तित्वाचं आणि नेतृत्वाचं संकट असल्याचा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केलाय.

काँग्रेससमोर अस्तित्वाचे संकट आहे, नेतृत्वाचे संकट आहे. आम आदमी पक्ष केवळ पोस्टरबाजीत व्यस्त आहे. राज्य चालवण्यासाठी आचार, विचार आणि नीती लागते. अराजकतेनं अस्तित्व दाखवता येतं पण राज्य चालवता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी काँग्रेसला आणि आम आदमी पत्राला लगावलाय. 2022 मध्ये भाजप पूर्ण आणि अश्वासक बहुमताने गोव्यात सरकार बनवेल, असा दावाही फडणवीस यांनी त्यावेळी केला होता.

इतर बातम्या :

‘मी पाच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं’, अजितदादा चुकून चुकले! जाहीर सभेत ‘कानाला खडा’

शेतकऱ्यांना ‘साले’ बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा, जयंत पाटलांचा घणाघात

Trinamool Congress to contest Goa Assembly elections

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.