AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील अब्बासी मुर्तजाच्या आयएस कनेक्शनचा संशय, लॅपटॉपमधून व्हिडीओ नकाशा यंत्रणांच्या हाती

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील (Gorakhpur) गोरखनाथ मंदिर (Gorakhnath Temple) परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणाऱ्या मुर्तजा अब्बासी (Murtaza Abbasi) यांच्यासंदर्भात येत्या काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Gorakhnath Temple Attack : गोरखनाथ मंदिर हल्ल्यातील अब्बासी मुर्तजाच्या आयएस कनेक्शनचा संशय, लॅपटॉपमधून व्हिडीओ नकाशा यंत्रणांच्या हाती
गोरखनाथ मंदीर Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 10:01 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील (Gorakhpur) गोरखनाथ मंदिर (Gorakhnath Temple) परिसरात रविवारी सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणाऱ्या मुर्तजा अब्बासी (Murtaza Abbasi) यांच्यासंदर्भात येत्या काळात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना आणि एटीएसला मिळालेल्या पुराव्यांमधून तशा प्रकारचे संकेत मिळत आहेत. गोरखनाथ मंदिरातील सुरक्षा रक्षकांवरील हल्ला दहशतवादी कटाचा भाग असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. माध्यमातील बातम्यांनुसार आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअर झालेल्या अहमद मुर्तझा अब्बासी दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असलण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या लॅपटॉपमधून पोलिसांना आयएस आणि सीरियासंबंधी काही व्हिडीओ मिळाले आहेत. मंदिरावर हल्ला करण्यापूर्वी तो नेपाळला जाऊन आल्याचं बोललं जातंय. अब्बासी जवळ मंदिराचा नकाशा देखील मिळाला असल्याचं म्हटलं जातंय. सध्या तपास यंत्रणांकडून याबाबत चौकशी सुरु आहे.

लॅपटॉप जप्त, सीरियासंबंधित व्हिडीओ आढळले

अब्बासी मुर्तजाच्या घरातील लोकांनी तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं म्हटलंय. मात्र, यासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूर येथील रहिवासी आहे. त्याच्यापासून लॅपटॉप आणि मोबाईल मिळाले आहेत. मीडिया रीपोर्टनुसार त्याच्या लॅपटॉपमधून आयएस संबंधित काही व्हिडीओ मिलाले आहेत. आता तपास यंत्रणांकडून अब्बासी जवळ फक्त व्हिडीओ आहेत की तो कोणत्या दहशतवादी संघटनेचा स्लीपर सेल आहे का याचा शोध घेतला जात आहे.

राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी या घटनेत दहशतवादी कनेक्शनचा इन्कार करु शकत नसल्याच म्हटलंय. अवस्थी यांनी यांनी गोरखनाथ मंदिरावर हल्ला ही घटना गंभीर कटाचा भाग असू शकतो. यासंदर्भातील पुरावे मिळाल्यानंतर याला दहशतवादी हल्ला म्हणू शकतो. हल्लेखोर त्याचे इरादे पूर्ण करण्यासाठी मंदिर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तो प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. जर तो मंदिरात घुसला असता तर मोठी घटना घडली असती, असं अवस्थी म्हणाले.

अब्बासीच्या फोनवर आढळले फतवे

मीडिया रिपोर्टनुसार अब्बासीच्या मोबाईल फोनवर फतवे मिळाले आहेत. त्यानुसार तो शस्त्रासंह एकटाच हल्ला करण्यासंदर्भात इंटरनेटवर माहिती घेत होता. मुर्तजा अब्बासी एका छोट्या शस्त्रासह हल्ला करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार होता. सध्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी एटीएस आणि एसटीएफ मुंबईला पाठवण्यात आली आहे. मुंबईत मुर्तजाच्या संपर्कातील लोकांची चौकशी केली जाणार आहे.

इतर बातम्या :

Mutual Funds : म्युच्युअल फंडाच्या फ्लोटर प्लॅनमध्ये कम्पाऊंडिंगचा चमत्कार; 10 हजारांच्या गुंतवणुकीतून 7.17 लाखांचा परतावा, 5 वर्षांत व्हा मालामाल

Bullock Cart Race VIDEO | वेगवान बैल जोडीसमोर मालक पडला, पायाखाली तुडवला जाणार तोच…

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.