देशभरातील पहिली ‘खेळणी जत्रा’, महाराष्ट्रातून प्रदर्शनासाठी काय?
महाराष्ट्र राज्यातील मुंबई, औरंगाबाद, अमरावती, पुणे या चार विभागाचे स्टॉल असणार आहे. (The India Toy Fair 2021)
मुंबई : देशभरात विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी पहिल्यांदा भारतात ‘भारतीय खेळणी जत्रा 2021’ भरणार आहे. येत्या 27 फेब्रुवारी ते 2 मार्चदरम्यान ही जत्रा भरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने ही जत्रा आयोजित केली जाणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत ही जत्रा आयोजित केली आहे. (The India Toy Fair 2021)
खेळणी तयार करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना चालना मिळण्यासाठी ही जत्रा आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे उद्धाटन केले जाणार आहे. या खेळणी जत्रेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, औरंगाबाद, अमरावती, पुणे या चार विभागाचे स्टॉल असणार आहे. हे चारही स्टॉल महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या खेळणी जत्रेत पारंपरिक खेळणी प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. त्यासोबतच इलेक्ट्रॉनिक खेळणी, विविध आकर्षक प्राणी-पक्षी, कार्टून पात्रांच्या खेळणी, कोडे सोडविण्यासाठीचे खेळ या खेळांचाही समावेश असणार आहे.
या जत्रेत देशातील- परदेशातील नावाजलेल्या व्यक्तींचे विविध चर्चासत्र, संभाषण सुद्धा असणार आहेत. देशभरातील पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घेता येणार आहे. यासाठी सर्व जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी यांनी ‘भारतीय खेळणी जत्रा 2021’ यासाठी ऑनलाईन पद्घतीने नोंदणी करावी.
यामध्ये सहभागी होण्यासाठी https://theindiatoyfair.in/ या वेबसाईटवर नोंदणी करावी. यावर General visitor म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. (The India Toy Fair 2021)
संबंधित बातम्या :
रात्री मुंबईत, आज केरळमध्ये; मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूची काँग्रेसला सोडचिठ्ठी; आपमध्ये प्रवेश