GPS | वाढदिवशी GPS ने चुकीची दिशा दाखवली, 2 डॉक्टर्सच आयुष्य संपलं, रस्ता समजून ते…..

GPS | त्याचा वाढदिवस होता. पाच जण कारमध्ये होते. रात्रीचा कोळख, धुवाधार पाऊस कोसळत होता. समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. म्हणून डॉक्टर अद्वैतने GPS ऑन केलं.

GPS | वाढदिवशी GPS ने चुकीची दिशा दाखवली, 2 डॉक्टर्सच आयुष्य संपलं, रस्ता समजून ते.....
GPS misguides way 2 young doctors
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 11:03 AM

कोच्ची : लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर बरेचजण GPS वर अवलंबून असतात. GPS योग्य रस्ता दाखवेल असा विश्वास असतो. खासकरुन रात्रीच्या प्रवासात GPS ची मोठी मदत होते. भारतात GPS चा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. GPS वर डोळेझाकून विश्वास ठेवला जातो. पण आता GPS कडून झालेल्या चुकीच्या दिशा मार्गदर्शनामुळे दोन डॉक्टर्सना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडलीय. डॉ. अद्वैत (29) आणि डॉ. अजमल असीफ (29) आणि अन्य तिघे होंडा सिव्हीकमधून प्रवास करत होते. मध्यरात्र झाली होती. रात्रीचे 12.30 वाजले होते. सर्व काळोख होता. धुवाधार पाऊस कोसळत होता. रस्ता परिचयाचा नव्हता. होंडा सिव्हीक कारमध्ये दोन डॉक्टर्स आणि अन्य तिघे होते.

रात्रीचा कोळख आणि समोरचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. म्हणून डॉ. अद्वैत यांनी GPS ऑन केले. ते गाडी चालवत होते. पाण्याने भरलेल्या रस्त्यावरुन त्यांची गाडी मार्ग काढत होती. GPS मॅप समोर रस्ता असल्याच दाखवलं. कार तशीच पुढे जात राहिली. अखेर कार पाण्याच बुडू लागली. कारण रस्ता समजून कार पुढे जात होती, तो रस्ता नव्हता, नदी होती. डॉ. अद्वैत आणि डॉ. अजमल असीफ यांचा बुडून मृत्यू झाला. अन्य तिघे कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. ते बचावले. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात गोथुरुथमध्ये रविवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. GPS वापराबद्दल एक्सपर्ट्स काय म्हणाले?

शनिवारी डॉ. अद्वैत यांचा वाढदिवस होता. ते आणि अन्य चार जण कोडुंगल्लूर येथून कोच्चीला परतत होते. बर्थ डेच्या शॉपिंगसाठी म्हणून ते तिथे गेले होते. GPS कडून मार्ग दाखवला जात असताना हा अपघात घडला. “आम्ही GPS स्टार्ट केलं होतं. मी कार चालवत नव्हतो. ही मानवी चूक होती की एप्लिकेशनमधील टेक्निकल प्रॉब्लेम हे मी स्पष्टपणे सांगू शकत नाही” असं बचावलेल्या एका डॉक्टरने सांगितंल. डॉ. अद्वैतचा बर्थ डे होता. म्हणून सेलिब्रेशनसाठी ते सर्व कोच्चीला गेले होते. यात हॉस्पिटलमधील एक पुरुष नर्सही होता. डॉ. अशोक रवी यांनी ही माहिती दिली. मान्सूनच्या काळात जीपीएस अल्गोरिदम फार ट्रॅफिक नसलेला मार्ग सुचवतात. पण तो रस्ता सुरक्षित असेलच असं नाही. दुचाकी ज्या मार्गावरुन जाते, तो मार्ग चारचाकीसाठी सुरक्षित असेलच असं नाही, असं एक्सपर्टने सांगितलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.