5 वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला देशातील धान्याचा साठा, गहू आणि तांदळाचे भाव वाढणार?
भारतातील धान्यसाठा हा चिंतेचा विषय बनत आहे. नुकतीच समोर आलेली आकडेवारी ही महागाईचा सूचक इशारा तर नाही ना?
मुंबई, देशातील वाढत्या महागाईच्या (Grain stocks in the country) पार्श्वभूमीवर आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. भारतात अन्नधान्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये अन्नधान्याच्या महागाईने 105 महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे. त्याच वेळी, देशातील धान्य साठा पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमध्ये गव्हाचा साठा गेल्या 6 वर्षांतील सर्वात कमी आहे. हे किमान साठ्यापेक्षा थोडेच अधिक आहे.
किती आहे स्टॉक
एफसीआयच्या आकडेवारीनुसार, 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत सार्वजनिक गोदामांमध्ये गहू आणि तांदळाचा एकूण साठा 511.4 लाख टन होता. मागील वर्षी हा आकडा 8.16 लाख टन इतका होता. देशात गहू आणि तांदळाच्या किमती वाढू नयेत आणि देशांतर्गत बाजारपेठेत त्यांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठीच सरकारने गहू आणि तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
गव्हाचा साठा किती आहे
सरकारकडे 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत देशातील गोदामांमध्ये 227.5 लाख टन गव्हाचा साठा होता. गेल्या 6 वर्षातील गव्हाच्या साठ्याची ही सर्वात कमी पातळी आहे. इतकेच नाही तर या तारखेसाठी 205.2 लाख टनांच्या किमान बफर स्टॉकपेक्षा तो थोडा जास्त आहे.
तांदळाचा साठा किती आहे
तांदळाचा साठा आवश्यक पातळीपेक्षा जवळपास 2.8 पट जास्त होता. त्यामुळेच FCI गोदामांमधील एकूण धान्य साठ्याची स्थिती 4 वर्षांपूर्वीच्या तुलनेत चांगली आहे. परंतु सप्टेंबरमध्ये महागाई वाढली असली तरी अन्नधान्याचा साठा न होणे ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे. तृणधान्ये आणि अन्नधान्य उत्पादनांचा महागाई दर सप्टेंबरमध्ये 11.53 टक्के होता. तृणधान्यांसाठी हा सर्वाधिक वार्षिक दर आहे.
पिठाची वाढलेली किंमत
गहू आणि पिठाचा वार्षिक किरकोळ महागाई दर 17.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 8 महिन्यांतील हा उच्चांक आहे. ऑगस्टमध्ये तो 15.72 टक्के होता, तर जुलैमध्ये हा दर 11.73 टक्के होता. गहू आणि गव्हाच्या पिठाचे भाव वाढले आहेत कारण शेतकऱ्यांनी अद्याप गव्हाची पेरणी केलेली नाही आणि पुढचे पीक मार्चच्या मध्यानंतरच बाजारात येईल.
जागतिक बाजारपेठेत गव्हाचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमतीत घसरण झाली आहे. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड एक्स्चेंजवर बेंचमार्क गहू फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टच्या किमती 7 मार्चच्या विक्रमी $12.94 प्रति बुशेलवरून 18 ऑगस्ट रोजी $7.49 वर घसरल्या.