Varun Singh: धीरोदत्त योद्धा: मृत्यूला भिडणारी वरुण सिंगांची शौर्यकहाणी, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

कठीण प्रसंगात मृत्यूला चकवा देणाऱ्या वरुण सिंग यांना आज (बुधवारी) वीरमरण प्राप्त झाले. आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल वरुण सिंग ख्यातकीर्त होते. अत्युच्च शौर्यासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

Varun Singh: धीरोदत्त योद्धा:  मृत्यूला भिडणारी वरुण सिंगांची शौर्यकहाणी, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?
मृत्यूला भिडणारी वरुण सिंगांची शौर्यकहाणी
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 6:01 PM

नवी दिल्ली : तमिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात सरसेनाध्यक्ष बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसहित 13 जणांना प्राणाला मुकावे लागले. या दुर्घटनेत हवाई दलाचे ग्रूप कॅप्टन वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. कठीण प्रसंगात मृत्यूला चकवा देणाऱ्या वरुण सिंग यांना आज (बुधवारी) वीरमरण प्राप्त झाले. आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल वरुण सिंग ख्यातकीर्त होते. अत्युच्च शौर्यासाठी त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

‘शौर्य’ पुरस्काराने गौरव

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात कॅप्टन वरुण सिंग यांना गौरविले गेले. वरुण सिंग यांनी 2020 मध्ये आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाज पणाला लावली होती. जमिनीपासून हजारो फूट अंतरावर नियंत्रण गमावलेल्या विमानावर पुन्हा नियंत्रण मिळवून LCA तेजस विमानाचा दुर्घटनेपासून बचाव केला होता. डोळ्यांत तेल घालून जमीनीपासून हजारो मीटर अंतरावर स्वत:चे आणि सामान्य जनतेचे प्राण वाचवले होते.

काय घडलं त्या दिवशी?

विंग कमांडर वरुण सिंग 12 ऑक्टोबर 2020 या दिवशी हवाई मोहिमेवर होते. जमिनीपासून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळानंतरच विमानाच्या संयंत्रात बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फ्लाईट कंट्रोल सिस्टीम (एफसीएस) आणि प्रेशराईज्ड सिस्टीम नादुरुस्त झाली होती. कठीण प्रसंगात विचलित न होता बिघाडाचे कारण तत्काळ जाणले आणि लँडिंगसाठी विमान कमी उंचीवर घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, विमानाला कमी उंचीवर आणताना फ्लाईट कंट्रोल सिस्टीम (एफसीएस) पूर्णपणे ठप्प झाली होती आणि विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते.

वेग, मृत्यू अन् वेळेशी झुंज

हवाई मोहिमेच्या आजवरच्या अनुभवात अशा कठीण प्रसंग यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. कॅप्टन सिंग यांनी मानसिक संतुलन राखत परिस्थिती पूर्वपदावर आणली. जमीनीपासून हजारो फूट अंतरावर विमानाच्या संयंत्रात बिघाड झाल्यानंतर वैमानिक जीवसंरक्षक साधनांचा वापर करून स्वत:चे प्राण वाचवितात. मात्र, सिंग यांनी विमानावरील ताबा अखेरपर्यंत सोडला नाही. जीवाची बाजी पणाला लावून सिंग यांनी देशाच्या संरक्षण सज्जतेत भर घालणाऱ्या विमानाला दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचविले होते.

कौशल्य, संयम आणि प्रसंगावधान राखत केवळ विमानाचे नुकसानच टळले नाही तर नागरिक, राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी टाळली. अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले.

लष्करी सेवेचा पिढिजात वारसा

ग्रूप कॅप्टन वरुण सिंग हे उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात स्थित कन्हौली गावचे रहिवाशी होते. वरुण सिंग यांच्या परिवाराला लष्करी सेवेचा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करातून निवृत्त झाले होते व सध्या त्यांचा भाऊ भारतीय नौदलात कार्यरत आहे. पत्नी व एक मुलगा, मुलगी यांच्यासह वेलिंग्टन मध्ये वास्तव्यास होते.कॅप्टन सिंग तमिळनाडूच्या वेलिंग्टन डिफन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे (DSSC) संचालक पदावर कार्यरत होते.

इतर बातम्या

SC on OBC Reservation | राज्य सरकार म्हणाले 6 महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकला; कोर्ट म्हणाले, आम्ही पाहू!

स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिने पुढे ढकला, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, 2 पर्याय सुचवले

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.