ड्रॅगन फ्रुटच्या वाढत्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न? फळाचं चक्क नावच बदललं

ड्रॅगन फ्रूट हे कमळाप्रमाणे दिसते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे विजय रुपाणी यांनी पत्रकारांना सांगितले. | Dragon fruit name to Kamlam

ड्रॅगन फ्रुटच्या वाढत्या प्रसिद्धीचा फायदा घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न? फळाचं चक्क नावच बदललं
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 11:35 AM

अहमदाबाद: आतापर्यंत देशातील जुन्या शहरांना भारतीय संस्कृतीला साजेशी नवी नावे देण्याची भाजपची मोहीम आणखी विस्तारली आहे. कारण, गुजरातमध्ये भाजप सरकारने ड्रॅग फ्रुटचे (Dragon fruit )नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.  त्यानुसार आता ड्रॅग फ्रुट हे आता कमलम (Kamlam) या नव्या नावाने ओळखले जाईल. ड्रॅगन फ्रूट हे कमळाप्रमाणे दिसते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे विजय रुपाणी यांनी पत्रकारांना सांगितले. यामध्ये राजकारणाचा भाग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे गांधीनगरमधील भाजप मुख्यालयाचे नावही श्रीकमलम असे आहे. (Gujarat Is Renaming Dragon Fruit Kamalam)

‘फळाला ड्रॅगन म्हणणं चांगलं वाटत नाही, राजकारण करु नका’

आम्ही ड्रॅग फ्रुटचे नाव बदलून कमलम करण्यासाठी अर्ज केला आहे. एखाद्या फळाला ड्रॅगन संबोधणे चांगले वाटत नाही. कमलम हा संस्कृत शब्द आहे. तसेच ड्रॅगन फ्रुटही दिसायला कमळासारखेच आहे.

भारतात बऱ्याच वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची लागवड होत आहे. आता त्याचे नाव बदलत असले तरी चिंता करण्याचे कारण नाही, असे विजय रुपाणी यांनी स्पष्ट केले.

चीनशी बिघडलेल्या संबंधांचा परिणाम?

ड्रॅगन हे चीनचे प्रतिक आहे. चीनशी ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे गुजरात सरकारने हा निर्णय घेतला असावा का, अशी चर्चा सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशांमधी संबंध कमालीचे बिघडले आहेत. लडाखमध्ये सध्या जीवघेणी थंडी असूनही दोन्ही देश आपापले सैन्य माघारी घ्यायला तयार नाही.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांत चीनला झटका देणारे काही निर्णय घेण्यात आले होते. त्यामध्ये अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय, दूरसंचार विभागासाठी आवश्यक असणारी तांत्रिक उपकरणे चिनी बनावटीची नसावीत, अशीही अट घालण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

अबू आझमी म्हणतात, पुणे, ठाणे, नवी मुंबईला ‘ही’ नावं द्या

अरुणाचल प्रदेशात चीननं वसवलं गाव; भारतीय म्हणतात…

(Gujarat Is Renaming Dragon Fruit Kamalam)

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...