गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह, व्यासपीठावर चक्कर येऊन पडल्यानंतर रुग्णालयात दाखल

विजय रुपाणी रविवारी एका सभेला संबोधित करताना चक्कर येऊन पडले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह, व्यासपीठावर चक्कर येऊन पडल्यानंतर रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 2:50 PM

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रुपाणी रविवारी एका सभेला संबोधित करताना चक्कर येऊन पडले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आलं आहे. रुपाणी यांच्यासह कच्छचे खासदार विनोद चावडा आणि गुजरात भाजपचे संघटन महामंत्री भीखु भाई दलसाणीया हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.(Gujarat Chief Minister Vijay Rupani Corona positive)

विजय रुपाणी यांच्यावर सध्या यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुजरातमध्ये सध्या स्थानिक निवडणुकांचं वारं वाहत आहे. काही दिवसांपूर्वीच उमेदवार निवडीसाठी प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीला विजय रुपाणी यांच्यासह कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्यात गुजराजचे प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. विजय रुपाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विजय रुपाणी व्यासपीठावरच कोसळले

दरम्यान विजय रुपाणी रविवारी एका जनसभेला संबोधित करण्यासाठी आले होते. तेव्हा व्यासपीठावरच ते चक्कर येऊन पडले. सध्या वडोदरा महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते निजामपुरा येथे प्रचासभेत बोलत होते. यावेळी भाषण करताना त्यांना चक्कर आली आणि ते स्टेजवरच कोसळले.

गुजरातमध्ये काही शहरांच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे येथे राजकीय वातावरण तापलेले आहे. येथे वेगवेगळ्या पक्षांकडून जोरदार प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत. भाजपकडूनसुद्धा येथे जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपतर्फे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भाषणे आयोजित केली जात आहेत. यावेळी वडोदरा येथील निजामपुरा भागात त्यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रचारसभेत बोलत असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि भाषण सुरु असतानाच ते अचानकपणे कोसळले. डॉक्टरांनी सागितल्याप्रमाणे ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे ते कासळले. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | गुजरातचे मुख्यमंत्री स्टेजवर कोसळले, रक्तदाब कमी झाल्याने आली भोवळ

गुजरातमध्ये ‘भारत बंद’ होणार नाही, जबरदस्तीने बंद पुकारल्यास कारवाई; मुख्यमंत्री रुपाणी यांचा इशारा

Gujarat Chief Minister Vijay Rupani Corona positive

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.