Gujarat Municipal Election Result : सूरतमध्ये काँग्रेसचा धुव्वा, AAP 2 नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता

आप पक्षाने सुरत महानगरपालिकेत काँग्रेसला मागे टाकत दोन नंबरचा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. ( Gujarat Municipal Election Result surat congress app)

Gujarat Municipal Election Result : सूरतमध्ये काँग्रेसचा धुव्वा, AAP 2 नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता
अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 3:59 PM

गांधीनगर : गुजरातमध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी (Gujarat Municipal Election) सुरु आहे. एकूण 6 महापालिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे जवलजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपचा गड म्हणवल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने (APP) चांगली कामगिरी केल्याचं दिसतंय. आप पक्षाने सुरत (surat) महानगरपालिकेत काँग्रेसला मागे टाकत दोन नंबरचा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे आपचे सध्याचे हे यश पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सूरतमध्ये मतमोजणी सुरु असून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरतो आहे. (aap defeating congress going to become two numbers party in surat)

गुजरातमध्ये एकूण 6 महानगरपालिकेसाठी निवडणुका झाल्या. त्यांची आज मतमोजणी होत आहे. यामध्ये राजकोट, भावनगर, जामनगर, सूरत, अहमदाबाद आणि वडोदरा या महापालिकांचा समावेश आहे. या सर्व महापालिकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड सुरु आहे. सध्या मतमोजणी सुरु असली तरी, भाजपला सर्व पालिकांमध्ये बहुमत मिळाल्याचे जवजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, उल्लेखनीय बाब म्हणजे तुलनने नवा म्हटल्या जाणाऱ्या आप या पक्षाने सुरतमध्ये चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे.

आपने काँग्रेसला मागे टाकत चक्क दोन नंबरचा सर्वांत मोठा पक्ष होण्याकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार सुरत महापालिकेच्या मतमोजणीत भाजप तब्बल 47 जागांनी पुढे आहे. तर आप पक्ष 9 जागांवर पुढे आहे. दुपारी 1 वाजता आप 18 जागांवर पुढे होता. मात्र, 2 वाजता आप काही वॉर्डामंध्ये मागे पडला असून सध्या तो 9 जागांवर पुढे. काँग्रेसचा विचार करायचा झाल्यास काँग्रेसच्या जागा कमी होताना दिसत असून काँग्रेसही सध्या 9 जागांवर पुढे आहे.

विजयर रुपाणी यांना मोठा झटका

दरम्यान, अहमदाबादमधील नाराणपुरा वॉर्डातील भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. गुजरातचे काँग्रेसचे नेते विजय रुपाणी यांच्या जिल्ह्यात म्हणजेच राजकोट येथे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. येथे काँग्रेस एकासुद्धा जागेवर आघाडीवर नाही. येथे सर्वच्या सर्व जागांवर भाजपने आघाडी घेतली असून  विजय रुपाणी आणि काँग्रेससाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार गुजरातमध्ये 6 महानगरपालिकांसाठी मतमोजणी होत असून, एकूण 576 जागांचे निकाल काही वेळात स्पष्ट होणार आहेत. सध्या भाजप 366 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस फक्त 51 जागांवर पुढे आहे.

2 वाजताची स्थिती

अमहदाबाद – भाजप 83, काँग्रेस 18 जागांवर पुढे

वडोदरा – भाजप 45 तर काँग्रेस 7 जागी आघाडीवर

राजकोट – सर्व 52 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

सूरत – भाजप 47, काँग्रेस 9 तर आप 9 जागांवर आघाडीवर

भावनगर – भाजप 25 तर काँग्रेस 5 जागांवर पुढे

जामनगर – भाजप 36, काँग्रेस 5, तर बसपा 5 जागी आघाडीवर

इतर बातम्या :

Gujrat Municipal Election Result : गुजरातच्या सर्व 6 महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

(aap defeating congress going to become two numbers party in surat)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.