बिल्डर ते लीडर, भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, नितीन पटेल म्हणाले, मान सन्मान महत्वाचा !

गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री (Gujarat new Cm) म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी शपथ घेतली. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली.

बिल्डर ते लीडर, भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, नितीन पटेल म्हणाले, मान सन्मान महत्वाचा !
Bhupendra Patel
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 4:44 PM

अहमदाबाद : गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री (Gujarat new Cm) म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी शपथ घेतली. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाला काही दिवसांनी शपथ दिली जाईल असं सांगितलं जात आहे. (Bhupendra Patel sworn in as the CM of Gujarat, Congratulations to Patel from PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदींकडून भूपेंद्र पटेल यांना शुभेच्छा

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन, ‘भूपेंद्र भाई यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्याचं काम पाहिलं आहे. मग ते भाजप पक्ष संघटना, नागरिक प्रशासन किंवा समाजसेवा असेल. ते निश्चितपणे गुजरातचा विकास मार्ग समृद्ध करतील’, असं म्हटलंय.

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडूनही शुभेच्छा

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनीही नवनिर्वाचित मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भूपेंद्र पटेल हे आमचे जुने कौटुंबिक मित्र आहेत. त्यांना मुख्यमंत्र्याच्या रुपात शपथ घेताना पाहून आनंद झाला. गरज पडल्यानंतर त्यांनी माझ्याकडून मार्गदर्शनही मागितलं आहे. दरम्यान, आपल्याला मुख्यमंत्री केलं नसल्याबाबत मी नाराज नाही. मी 18 वर्षापासून जनसंघ आणि आता भाजपचा कार्यकर्ता आहे आणि राहिन. कोणत्याही पदापेक्षा लोकांचं प्रेम आणि सन्मान ही मोठी बाब असल्याचं नितीन पटेल म्हणाले.

बिल्डर ते लीडर

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. त्यांचं पाटीदार समाजावर वर्चस्व आहे. पटेल हे 59 वर्षाचे आहेत. पटेल हे अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यांनी कधीही मंत्रीपद भूषविलेले नाही.

स्थायी समिती अध्यक्ष ते मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. 1999-2000मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2015-17मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच 2008-10 मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.

इतर बातम्या : 

भूपेंद्र पटेलांची मुख्यमंत्रीपदी वर्णी कशी लागली?, दिल्लीत स्क्रिप्ट लिहिली, अहमदाबादेत वाचन?; वाचा सविस्तर

Bhupendra Patel | भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या बैठकीत निर्णय

Bhupendra Patel sworn in as the CM of Gujarat, Congratulations to Patel from PM Narendra Modi

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.