VIDEO: ‘मी विष्णूचा 10 वा अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही’, गुजरातच्या सरकारी अधिकाऱ्याचे अजब दावे
गुजरातमधील एका सरकारी अधिकाऱ्याने अजब दावे केले आहेत. रमेशचंद्र फेफार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
गांधीनगर : गुजरातमधील एका सरकारी अधिकाऱ्याने अजब दावे केले आहेत. रमेशचंद्र फेफार असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याने आपण विष्णूचा 10 अवतार असल्याचा दावा केलाय. तसेच तपश्चर्या करण्यात व्यस्त असल्याने ऑफिसला येऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर खूप कमी संत देव असतात त्यापैकी एक योगगुरु रामदेव बाबा देखील देव असल्याचा दावा केलाय. महाभारताच्या काळात माझ्यावर जसे सर्व हसले होते तसेच तुम्ही सर्व हसत आहात. महाभारत काळातील लोकांप्रमाणेच तुम्हालाही माझ्यातील देव दिसत नाहीये, असाही दावा या अधिकाऱ्याने केला (Gujrat Government officer claim himself 10th Avatar of Lord Vishnu Ramdev Baba as God).
#WATCH: A Gujarat govt official Rameshchandra Fefar,who claims that he is incarnation of Kalki, 10th incarnation of Lord Vishnu,said, ‘Just like everybody laughed at me at the time of Mahabharata, you guys are doing the same because you’re unable to see God in me’. (18.5.2018) pic.twitter.com/QJWLErLuK0
— ANI (@ANI) May 19, 2018
रमेशचंद्र फेफार म्हणाले, “मी विष्णूचा 10 वा अवतारच आहे, पण ज्या प्रमाणे हस्तीनापूरच्या सभेतील लोकांना कृष्णात देव दिसला नाही त्याप्रमाणेच तुम्हीही आत्ता माझ्यात देव पाहू शकत नाहीये. देशाला हे कळू द्या की सत्ययुगाची सुरुवात झालीय हे देशाला समजलं तरी ते माझ्यासाठी पुरेसं आहे. 16 सप्टेंबर 2012 सकाळी साडेसात वाजता सत्ययुगाची सुरुवात झालीय. लोकांना इतकंच समजलं तरी खूप झालं.”
“लोकांना सांगता आईवडिलांना सांभाळा, तुम्ही तुमच्या कुटुंबाला का सांभाळत नाही?”
रमेशचंद्र फेफार यांच्या या दाव्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना तुम्ही लोकांना सांगता आईवडिलांना सांभाळा आणि तुम्ही स्वतः तुमच्या कुटुंबाला का सांभाळत नाही? असा प्रश्न विचारला. यावर रमेशचंद्र फेफार म्हणाले, “देवाचा त्याच्या प्रत्येक जन्मात पत्नीपासून वियोग (फारकत) होतो.”
“बाबा रामदेव देव आहेत”
रमेशचंद्र फेफार केवळ स्वतः देव असल्याचा दावा करुन थांबले नाहीत. त्यांनी योगगुरु बाबा रामदेव हे देखील देव असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “बाबा रामदेव खरंच देव आहेत. भारतात खूप थोडे संत देव आहेत. त्यापैकीच बाबा रामदेव एक आहेत.”
“कृष्ण अवतारात जेव्हा पांडवांसाठी मी 5 गावं मागण्यासाठी हस्तीनापूरच्या राजसभेत गेलो होतो तेव्हा राजसभेतील सर्व सदस्य तुमच्या सारखेच माझ्यावर हसत होते,” असं म्हणत त्यांनी आपल्या दाव्यावर हसणाऱ्या पत्रकारांना उत्तर दिलं.
हेही वाचा :
नरेंद्र मोदी दिलदार आहेत, गुजरातला 1000 कोटी दिले, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील: राऊत
Cyclone Tauktae Effect: मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, जळगावात दोन बहिणींचा मृत्यू
Mucormycosis : गुजरातमध्ये 500 कोरोना रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’, 20 जणांचे डोळे निकामी, तर 10 जणांचा मृत्यू
व्हिडीओ पाहा :
Gujrat Government officer claim himself 10th Avatar of Lord Vishnu Ramdev Baba as God