Gujrat Municipal Election Result : गुजरातच्या सर्व 6 महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

6 महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यात राजकोट, भावनगर, जामनगर, सूरत, अहमदाबाद आणि वडोदरा या महापालिकांचा समावेश आहे.

Gujrat Municipal Election Result : गुजरातच्या सर्व 6 महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 3:16 PM

मुंबई : गुजरातमधील 6 महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यात राजकोट, भावनगर, जामनगर, सूरत, अहमदाबाद आणि वडोदरा या महापालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीत भाजपने जुन्या नेत्यांना हटवून नवे चेहरे दिले होते. सध्या अहमदाबादेतील खाडिया वार्डमध्ये 3 जागांवर काँग्रेस तर एका जागेवर एमआयएमचा उमेदवार आघाडीवर आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजपला मोठं यश मिळत आहे.(BJP wins in 6 municipal elections in Gujarat)

सूरतमधील वार्ड क्रमांक 2 मध्ये अमरोली, मोटा वराछा इथं आपच्या उमेदवारानं विजय मिळवला आहे. तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे. अद्याप या जागांचे निकाल हाती आलेले नाहीत. संध्याकाळी 6 वाजता अहमदाबादेतील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री विजय रुपाणी, प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आणि अन्य नेते विजयाचा जल्लोष करतील आणि जनेतेचे आभार व्यक्त करतील. सध्या भाजप 276 जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजकोट जिल्ह्यात काँग्रेस सर्व जागांवर पिछाडीवर आहे. आतापर्यंत भाजप एकूण 201 तर काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. सूरतमधील ८ जागांवर आपच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

AIMIM ला मोठा झटका

सुरुवातीला हाती आलेल्या कलांमध्ये असदुद्दीने ओवेसी यांच्या AIMIM पक्षाचे 4 उमेदवार आघाडीवर होते. बहरामपूरमधील जागा AIMIM साठी मजबूत मानली जात होती. पण तिथे AIMIMच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागतोय. इथं काँग्रेसचं पॅनल विजयी ठरलं. त्याचबरोबर दरियापूर इथं स्वत: ओवेसी यांनी प्रचार केला होता. पण इथंही काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तिकडे सूरतमध्ये आम आदमी पक्षाने 9 जागा मिळवल्या आहेत. तर काँग्रेसचं जोरदार टक्कर देत आहे.

2 वाजताची स्थिती

अमहदाबाद – भाजप 83, काँग्रेस 18 जागांवर पुढे

वडोदरा – भाजप 45 तर काँग्रेस 7 जागी आघाडीवर

राजकोट – सर्व 52 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

सूरत – भाजप 47, काँग्रेस 9 तर आप 9 जागांवर आघाडीवर

भावनगर – भाजप 25 तर काँग्रेस 5 जागांवर पुढे

जामनगर – भाजप 36, काँग्रेस 5, तर बसपा 5 जागी आघाडीवर

संबंधित बातम्या :

मोदी-शाह स्वप्नपूर्तीच्या आणखी जवळ, पुदुचेरी ‘काँग्रेसमुक्त’; भारतात आता किती काँग्रेसशासित राज्य उरली?

‘मिशन बंगाल’, झारखंडचे तीन माजी मुख्यमंत्री मैदानात; वाचा भाजपचा संपूर्ण प्लान

BJP wins in 6 municipal elections in Gujarat

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.