Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापीच्या सर्व्हे रिपोर्ट आज कोर्टात दाखल होणार नाही, घोडं कुठं अडलं?; सस्पेन्स कायम

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेच्या विरोधात अंजुमन इंजतामिया मशीद कमिटीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापीच्या सर्व्हे रिपोर्ट आज कोर्टात दाखल होणार नाही, घोडं कुठं अडलं?; सस्पेन्स कायम
ज्ञानवापीच्या सर्व्हे रिपोर्ट आज कोर्टात दाखल होणार नाही, घोडं कुठं अडलं?; सस्पेन्स कायमImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 11:22 AM

वाराणासी: ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Masjid) रिपोर्ट आज कोर्टात सादर होण्याची शक्यता कमी आहे. आमचा रिपोर्ट 50 टक्के पूर्ण आहे, अशी माहिती असिस्टंट कोर्ट कमिशनर अजय प्रताप सिंह यांनी सांगितलं. रिपोर्ट पूर्ण तयार नाही, त्यामुळे कोर्टात आज रिपोर्ट सादर होणार नाही. आम्ही कोर्टात अर्ज सादर करून वेळ मागून घेणार आहोत. आम्हाला रिपोर्ट तयार करण्यासाठी अजून दोन ते तीन दिवसांचा वेळ हवा आहे, असंही सिंह यांनी सांगितलं. ज्ञानवापी मशिदीची लढाई आता देशातील सर्वात मोठ्या कोर्टात पोहोचली आहे. आज मुस्लिम (muslim) पक्षकारांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होणार आहे. अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीने या सर्व्हेला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. 1991च्या प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टच्या विरोधात सर्व्हेचा आदेश असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.

ज्ञानवापी सर्व्हेशी संबंधित पाच गोष्टी

  1. ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेच्या विरोधात अंजुमन इंजतामिया मशीद कमिटीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या सूचीनुसार जस्टिस डीवाय चंद्रचूड आणि जस्टीस पीएस नरसिम्ह यांचे खंडपीठ दुपारी 1 वाजता यावर सुनावणी करणार आहे.
  2. सोमवारी हा सर्व्हे झाला होता. त्यावेळी हिंदू पक्षाच्या वकिलाने सांगितले होते की, या परिसरात शिवलिंग सापडलं आहे. त्यानंतर विश्व वैदिक सनातन संघााचे अध्यक्ष जितेंद्र सिंह बिसेन यांनी या प्लॉटवर आमचा दावा आहे, असं म्हटलं होतं. तिथे शिवलिंग मिळालं आहे. त्यामुळे आता आम्ही वाट पाहणार नाही. लवकरात लवकर मंदिराची निर्मिती करणार आहोत, असं बिसेन यांनी म्हटलं होतं.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ज्ञानवापी मशीद सर्व्हे झाल्यानंतर हिंदू पक्षाने मंदिराच्या आतील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला होता. तर मुस्लिम पक्षाने मशिदीच्या आता कोणतंही शिवलिंग सापडलं नसल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील पाणी घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या ठिकाणी शिवलिंग सापडलं.
  5. वाराणासीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीशी संबंधित वादावरील याचिकांवरील सुनावणी अलाहाबाद कोर्टाने पुढे ढकलली आहे. 20 मेपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. जस्टिस पांड्या यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ही सुनावणी 20 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  6. ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेच्या तिसऱ्या दिवशी आत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर वाराणासी कोर्टाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. 16 मे रोजी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. हा सर्वात मोठा पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे या परिसरात मुस्लिमांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केल होती. तर, हे शिवलिंग नसून एक फव्वारा आहे. प्रत्येक मशिदीत फव्वारा असतो. तसेच ही जागा सील करण्याचा आदेश म्हणजे 1991च्या अधिनियमाचं उल्लंघन असल्याचा दावा, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.