Ramlila | रामलीला सुरु असताना हनुमानाने रामाच्या चरणी घेतला अखेरचा श्वास, नेमकं काय घडलं?
Ramlila | राम मंदिर उद्धाटनाच्या निमित्ताने देशाच्या वेगवेगळ्या भागत कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं. हरीश हे ऊर्जा विभागातील जेईच्या पदावरुन रिटायर झाले होते. मागच्या 25 वर्षांपासून ते रामलीलेत हनुमानाची भूमिका साकारत होते.
Ramlila | अयोध्येत काल भव्य राम मंदिराच उद्घाटन झालं. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. संपूर्ण देशात उत्साहाच वातावरण पहायला मिळालं. राम मंदिर उद्धाटनाच्या निमित्ताने देशाच्या वेगवेगळ्या भागत कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं. हरयाणातील भिवानीमध्ये अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक दु:खद घटना घडली. स्टेजवर रामलीलाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी हनुमानाचा रोल निभावणाऱ्या हरीश मेहता यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. काहीवेळ तर लोकांना नेमकं काय घडलय हेच समजलं नाही. हरीश यांना ह्दयविकाराचा झटका आल्याच समजल्यानंतर त्यांना लगेच उचलून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.
भिवानीतील जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेने राजतिलक कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. यावेळी रामलीलेत हनुमानाचा रोल साकारणाऱ्या हरीश मेहता यांनी प्रभूरामाच्या चरणी लीन होताच प्राण सोडले. हनुमानाची भूमिका साकारणारे हरीश मेहता प्रभूरामाच्या चरणी लीन झाले, त्यानंतर बराचवेळ उठले नाहीत. लोकांना वाटलं की, ते रामाची पूजा करतायत.
कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था
तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी उठवण्याचा प्रयत्न केला. पण ते उठलेच नाहीत. लगेच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरने त्यांचा मृत घोषित केलं. या दुर्देवी घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे. मृत हरीश यांच्या कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था आहे.
तो पर्यंत उशीर झाला
मृत हरीश हे ऊर्जा विभागातील जेईच्या पदावरुन रिटायर झाले होते. मागच्या 25 वर्षांपासून ते रामलीलेत हनुमानाची भूमिका साकारत होते. कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं की, ते रामाच्या चरणी लीन झाले, ते उठलेच नाहीत. त्यांना अंचल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तो पर्यंत उशीर झाला होता.
सहकलाकार काय म्हणाले?
डॉक्टर विनोद अंचल यांनी सांगितल की, “हरीश यांना रुग्णालयात आणलं होतं. पण इथे आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता” अचानक हरीश मेहता यांचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हरीश यांच्यासोबत असं काही घडेल, असं अजिबात वाटल नव्हतं, असं सहकलाकारांनी सांगितलं.