Maharashtra Breaking News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत

| Updated on: Aug 16, 2023 | 7:56 AM

Happy Independence Day 2023 LIVE Celebration Parade Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10 व्यां दा लाल किल्ल्यावरुन तिरंगा ध्वज फडकवतील. त्यानंतर त्यांचं भाषण होईल. पीएम मोदी यांना त्याआधी 7.30 वाजता 21 तोफाची सलामी दिली जाईल.

Maharashtra Breaking News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi

नवी दिल्ली : देश आज 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करतील. पंतप्रधानांची ध्वजारोहण करण्याची ही 10 वी वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात कुठले मुद्दे मांडणार? कुठल्या नव्या घोषणा करणार? याची उत्सुक्ता आहे. सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांवर त्यांच्या भाषणाचा फोकस असेल. आयुष्मान योजना पार्ट-2, यूनिफॉर्म सिविल कोड आणि काही नवीन योजनांवर बोलू शकतात. पीएम मोदी आपल्या भाषणात थिएटर कमांडची घोषणा सुद्धा करु शकतात.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात 1800 खास पाहुणे सहभागी होणार आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 75 जोड्यांना पारंपारिक वेषात समारंभासाठी निमंत्रित केलं आहे. या कार्यक्रमात देशभरातून 400 पेक्षा जास्त सरपंच, 250 शेतकरी आणि सेंट्रल विस्टाशी संबंधित कामगार सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्य दिनाशी संबंधित कार्यक्रमाची प्रत्येक अपडेट टीव्ही 9 मराठीवर जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Aug 2023 04:45 PM (IST)

    Bachhu Kadu News : आ. बच्चू कडू यांची सायकल रॅली

    आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत शहिदांच्या आणि तिरंग्याच्या सन्मानार्थ सायकल रॅलीत सहभाग घेतला. बच्चू कडू यांनी या रॅलीत 30 किलोमीटर सायकल चालवली. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने तरुणवर्ग दिसून आला.

  • 15 Aug 2023 04:31 PM (IST)

    Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांनी केली पुलाची हवाई पाहणी

    स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्तीसगड आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या पुलाचे उद्धघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कोठी-कोरनार पुलाचं काम पूर्ण झाले. दोन राज्यांना हा पुल जोडणार आहे. या कामाची हवाई पाहणी त्यांनी केली.

  • 15 Aug 2023 04:18 PM (IST)

    CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडीत दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. ते पिडीत कुटुंबांची भेट घेणार आहेत.  रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत 19 जुलै रोजी भूस्खलन झाले होते. या दूर्घटनेत 27 जणांचा मृत्यू ओढावला होता. अनेक जण दबल्या गेले होते. चार दिवस बचावकार्य सुरु होते. इर्शाळवाडीतील विस्थापित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या कामाला मोठी गती आली आहे.

  • 15 Aug 2023 12:58 PM (IST)

    गिरीश महाजन बाईक चालवत तिरंगा रॅलीत सहभागी

    मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भाजपची तिरंगा रॅली

    गंगापूर रोडवरील शहीद सर्कलपासून झाली तिरंगा रॅलीला सुरुवात

  • 15 Aug 2023 12:45 PM (IST)

    ठाणे रुग्णालय मृत्यू प्रकरणी ठाकरे गटाची मोठी मागणी

    ठाणे रुग्णालय मृत्यू प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा,

    ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांची मागणी

  • 15 Aug 2023 12:30 PM (IST)

    नवाब मलिक यांच्या भेटीला अजित पवार गटाचे नेते

    जेलमधून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीला

    नवाब मलिक यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, वाचा सविस्तर… 

  • 15 Aug 2023 12:15 PM (IST)

    महाविकास आघाडी सारं अलबेल?

    काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत

    मातोश्रीवरील बैठकीत प्लॅन बी वर चर्चा

  • 15 Aug 2023 11:59 AM (IST)

    Independence Day 2023 LIVE | संभाजी भिडे यांच्यावर सरकारने तातडीने देशद्रोहाची कारवाई करावी- विजय वडेट्टीवार

    चंद्रपूर: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भगवा रॅली काढणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर महाराष्ट्र सरकारने तातडीने देशद्रोहाची कारवाई करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हा अपमान सहन करण्यासारखा नसून ज्यांनी भिडेंना गुरुजींची उपमा दिली आहे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे यात काय म्हणणे आहे हेही महाराष्ट्राला समजले पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले. देशाचे पंतप्रधान आज तिरंग्याला नमन करत असताना भिडेची पिलावळ मात्र वेगळी भूमिका घेते यावर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

  • 15 Aug 2023 11:42 AM (IST)

    Ajit Pawar | शरद पवारांसोबत कौटुंबिक भेट घेत असतो

    नवाब मालिकांशी अजून कोणतीही चर्चा झालेली नाही.शरद पवारांची भेट घेताना लपून गेलो नाही. शरद पवारांसोबत भेट घेत असतो. भविष्यात पवारांना भेटल्यास वेगळा अर्थ घेऊ नका. शरद पवारांसोबत कौटुंबिक भेट घेत असतो. शरद पवार वडीलधारे म्हणून भेटलो. शरद पवारांशी भेटीत राजकीय चर्चा नाही. पुतण्याने काकांची भेट घेतल्यास गैर काय? – अजित पवार

  • 15 Aug 2023 11:20 AM (IST)

    Independence Day 2023 LIVE | पुण्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची रॅली

    पुण्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची रॅली. SP कॉलेजपासून रॅलीला सुरुवात झाली आहे. भाजपचे कार्यकर्ते हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झालेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रॅलीचं आयोजन….

  • 15 Aug 2023 11:06 AM (IST)

    BJP Meeting | भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक

    नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर 15 निवडणूक समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • 15 Aug 2023 10:47 AM (IST)

    Kolhapur News | अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठी समाजाच्या बैठकीत गोंधळ

    कोल्हापुरात अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरू होती. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ केला. ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत त्यांनी हा गोंधल केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

  • 15 Aug 2023 10:35 AM (IST)

    Entertainment News | हृतिक रोशन-दीपिका पादुकोणच्या ‘फायटर’चं मोशन पोस्टर प्रदर्शित

    स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या मोशन पोस्टरमध्ये हृतिक आणि दीपिका हे फायटर पायलटच्या भूमिकेत दिसून येत आहेत. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 15 Aug 2023 10:23 AM (IST)

    Ajit Pawar Speech | कोल्हापूरची हद्द वाढ होणे खूप गरजेचं- अजित पवार

    “कोल्हापूरची हद्दवाढ होणे खूप गरजेचं आहे. यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. सगळ्यांशी बोलून हे निर्णय पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. हद्द वाढ करण्याच्या विरोधात असणाऱ्यांनी देखील याला सहकार्य करणे गरजेचे आहे. पुढील 50 वर्षाचा विचार करून आपल्याला सर्व नियोजन करावे लागेल,” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

  • 15 Aug 2023 09:45 AM (IST)

    LIVE UPDATES: लवकरच अनेक विकासकामांचा शुभारंभ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    76 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा देतो. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा तिरंगा सन्माने डौलत राहील. अशी प्रार्थना करतो. स्वतंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ५०० पाहुणे बोलावले आहेत. मोदींच्या नेतृत्वात देशाचा आणि शिदेंच्या नेतृत्वात राज्याचाच विकास करणार आहोत. लवकरच अनेक विकासकामांचा शुभारंभ होईल असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत…

  • 15 Aug 2023 09:39 AM (IST)

    LIVE UPDATES: गिरीश महाजन यांनी 76 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

    राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. शिवभोजन थाळीच्या 10 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळतोय. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघून 1 रुपयात विमा योजना सुरू केलीय. शेतकऱ्यांना विविध योजनेतून अनुदान देत आहे. खरीप क्षेत्र वाढविण्यासाठी यावर्षी भर दिला जातोय. नैसर्गिक संकटातून वाचविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. धरणांतील गाळ काढण्याचे ही काम केले जात आहे, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर दूत ही संकल्पना राबवत आहे. मॉडेल स्कुल म्हणून ग्रामीण भागात शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी भर दिला जात आहे.. असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.

  • 15 Aug 2023 09:06 AM (IST)

    LIVE UPDATES: जगात विकसित भारताचा तिरंगा ध्वज असावा

    जगात विकसित भारताचा तिरंगा ध्वज असावा. आम्हाला एक रात्र सुध्दा थांबून चालणार नाही, त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा भारत एक विकसित देश असेल.

  • 15 Aug 2023 09:00 AM (IST)

    PM Modi’s Independence day address : मला आतापर्यंत लोकांनी आर्शिवाद दिला आहे

    कठोर परिश्रम घेतलं आहे, देशासाठी घेतलं आहे. मला आतापर्यंत लोकांनी आर्शिवाद दिला आहे. मी तुमच्यासाठी जगतोय, मला स्वप्न जरी पडलं तरी तुमच्यासाठी असतं असं मोदी म्हणाले

  • 15 Aug 2023 08:53 AM (IST)

    PM’s Independence Day speech : लाल किल्ल्यावरुन पुन्हा मी तुमचे आर्शीवाद मागत आहे.

    लाल किल्ल्यावरुन पुन्हा मी तुमचे आर्शीवाद मागत आहे. मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.आमची सरकारी व्यवस्था पहिली सु्ध्दा काम करीत आहे. सध्या आम्ही व्यवस्थेमध्ये अनेक बदल केला आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधात मोठं काम केलं आहे. भारताच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं काम करीत आहेत.

  • 15 Aug 2023 08:47 AM (IST)

    Independence Day 2023 LIVE : महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार – पंतप्रधान मोदी

    जेव्हा आयकर सूट मिळते, तेव्हा त्याचा सर्वाधिक फायदा नोकरी करणाऱ्या वर्गाला होतो. जग महागाईच्या संकटाला तोंड देत आहे. आम्ही जगभरातून आयात देखील करीत आहोत. भारताने महागाई नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. देशाला महागाईपासून मुक्त करणे हे आमचे ध्येय आहे.

  • 15 Aug 2023 08:41 AM (IST)

    PM’s Independence Day speech : भारत महिलांच्या नेतृत्वाखाली विकास पाहत आहोत – मोदी

    भारत महिलांच्या नेतृत्वाखाली विकास पाहत आहोत. आपण प्रादेशिक आकांक्षांचा आदर केला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना संबोधित केले पाहिजे, भारत लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल आहे. मी जेव्हा ऐक्याबद्दल बोलतो तेव्हा मणिपूरमध्ये हिंसाचार होत असेल तर महाराष्ट्रात वेदना जाणवतात असं मोदींना सांगितलं.

  • 15 Aug 2023 08:33 AM (IST)

    भारताची वैश्विक अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे – पीएम मोदी

    2014 च्या दरम्यान भाजप सत्तेवर आली, त्यावेळी भारताची वैश्विक अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावर होती. सध्या भारताची वैश्विक अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. देशभरात उघडलेल्या जनऔषधी केंद्रांमधून लोकांना अल्पदरात औषध मिळत आहेत. या जनऔषधी केंद्रांची संख्या १० हजारांवरून २५ हजार करण्यात येणार आहे.

  • 15 Aug 2023 08:28 AM (IST)

    Narendra Modi Live : पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा योजनेची घोषणा

    येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह देशाला नवीन बळ देण्यासाठी आम्ही विश्वकर्मा योजना सुरू करणार आहोत. पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांसाठी 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या वाटपासह सरकार पुढील महिन्यात विश्वकर्मा योजना सुरू करणार आहे.

  • 15 Aug 2023 08:22 AM (IST)

    जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी

    आज देशाला जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. जी-20 च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामुळे भारतीयांची क्षमता जगासमोर आली.

  • 15 Aug 2023 08:18 AM (IST)

    Modi Live : झोपडपट्टीतील मुलं जगात पराक्रम दाखवत आहेत – पंतप्रधान मोदी

    झोपडपट्टीतील मुलं जगात पराक्रम दाखवत आहेत – पंतप्रधान मोदी

    पीएम मोदी म्हणाले की, आज झोपडपट्टीतील मुलं जगात आपली ताकद दाखवत आहेत. ग्रमीण भागातील, छोट्या शहरांतील तरुण, आपली मुलं जगात चमत्कार दाखवत आहेत. मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो, आज संधींची अजिबात कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी उपलब्ध आहेत, आकाशापेक्षा जास्त संधी देण्याची क्षमता आपल्या देशात आहे.

  • 15 Aug 2023 08:15 AM (IST)

    LIVE UPDATES : देशात संधींची अजिबात कमतरता नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज आपल्याकडे लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता आहे. या तीन गोष्टी एकत्र करुन आपल्याला देशाची स्वप्नं साकार करायचं आहे. देशात संधींची अजिबात कमतरता नाही.

  • 15 Aug 2023 08:11 AM (IST)

    Modi Live : मी मागच्या दहा वर्षाचा हिशोब देशाला देत आहे – मोदी

    भारताच्या ताकदीची ओळख आता जगाला झाली आहे. मी मागच्या दहा वर्षाचा हिशोब देशाला देत आहे. भारतात जी काही प्रगती झाली आहे, त्याकडे संपूर्ण देश पाहत आहेत. शेतकऱ्यांना खतावर १० कोट रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे.

  • 15 Aug 2023 08:07 AM (IST)

    PM Narendra Modi : देशासमोर पुन्हा एक संधी – नरेंद्र मोदी

    मी गेल्या 1000 वर्षांबद्दल बोलत आहे कारण मला दिसत आहे की देशासमोर पुन्हा एक संधी आहे. आपण सध्या ज्या युगात वावरत आहोत, आपण जे काही करतो, आपण जी पावले उचलतो आणि एकापाठोपाठ एक घेतलेले निर्णय हे एका सुवर्ण इतिहासाला जन्म देईल असंही मोदी म्हणाले

  • 15 Aug 2023 08:04 AM (IST)

    Narendra modi : देशभरातील लोक मणिपूरच्या लोकांसोबत – पंतप्रधान मोदी

    पीएम मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मणिपूरमध्ये हिंसाचाराचा काळ होता. तिथं गडबड झाली आहे, पण आज तिथे परिस्थिती सामान्य होत आहे. शांतता परत येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहेत. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे.

  • 15 Aug 2023 08:00 AM (IST)

    PM Modi Speech | भारतातून निर्यात वेगाने वाढतेय

    भारतातून निर्यात वेगाने वाढतेय. तज्ज्ञ याकडे पाहतायत. त्यांना माहितीय भारत आता थांबणार नाही. कोरोना काळानंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर आकाराला येत आहे. बदलणाऱ्या विश्वाला आकार देण्यात तुमच सामर्थ्य दिसून येतय. कोरोना काळात भारत ज्या प्रकारे पुढे गेला, ते जगाने पाहिलं असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 15 Aug 2023 07:57 AM (IST)

    PM Modi Speech | पण भारत युवा होतोय

    आपल्याकडे लोकशाही आणि विविधता आहे. जगातील देश वयोवृद्ध होत चालले आहेत. पण भारत युवा होतोय. आज घेतलेल्या निर्णयाने भविष्य निश्चित होईल. सामर्थ्य देशाच भाग्य बदलेल. आता थांबायच नाहीय.

  • 15 Aug 2023 07:51 AM (IST)

    PM Modi Speech | जगात 30 वर्षापेक्षा सर्वात कमी लोकसंख्या कुठे?

    आज जगात 30 वर्षापेक्षा कमी वयाची सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे.याच्या बळावर आपण बरच काही साध्य करु शकतो. आता आपल्याला थांबायच नाहीय, दुविधेमध्ये जगायच नाहीय, गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे. आपण जे काही निर्णय घेऊ, ते पुढच्या 1000 वर्षाची दीशा निर्धारित करतील असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 15 Aug 2023 07:46 AM (IST)

    PM Modi Speech | पुढच्या 1000 वर्षाबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

    मी 1000 वर्षापूर्वी गोष्ट यासाठी बोलतोय कारण पुन्हा एकदा संधी आली आहे. हे अमृतकाळाच पहिल वर्ष आहे. या कालखंडात आपण जी पावलं उचलू, जे निर्णय घेऊ त्याचा पुढच्या 1000 वर्षावर प्रभाव पडेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 15 Aug 2023 07:41 AM (IST)

    PM Modi Speech | पंतप्रधान मोदी मणिपूरबाबत काय म्हणाले?

    मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपल जीवन गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 15 Aug 2023 07:38 AM (IST)

    PM Modi Speech | पंतप्रधान मोदी यांचं LIVE भाषण

    आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी यांचं भाषण सुरु आहे.

  • 15 Aug 2023 07:29 AM (IST)

    PM Modi Speech | पीएम मोदी 10 व्यां दा फडकवणार तिरंगा

    लाल किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॉर्ड ऑफ ऑनर दिला गेला. मेजर विकास सांगवान यांनी पीएम मोदी यांना स्कॉट केलं.

  • 15 Aug 2023 07:26 AM (IST)

    PM Modi Speech | लाल किल्ल्यावर पोहोचले मोदी

    पीएम नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना रिसीव केलं. पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

Published On - Aug 15,2023 7:24 AM

Follow us
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.