तिनं आधी नवऱ्याचा खून केला तरी कोर्ट म्हणतं, नवऱ्याची पेन्शन तिला मिळणार !
एखाद्या वेळी जर पत्नीने पतीची हत्या केली तरीसुद्धा तिला कौंटुबिक पेन्शनचा अधिकार मिळणार आहे. (Haryana Punjab HC On Pension Decision)
नवी दिल्ली : कौटुंबिक पेन्शनसंदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यानुसार एखाद्या वेळी जर पत्नीने पतीची हत्या केली तरीसुद्धा तिला कौंटुबिक पेन्शनचा अधिकार मिळणार आहे. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान हरियाणा कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे. (Haryana Punjab HC On Pension Decision)
जरी पत्नीने तिच्या पतीचा रागात किंवा कौंटुबिक वादातून खून केला, तरी त्या महिलेला नवऱ्याची पेन्शन मिळू शकते. कोणत्याही कारणाने पत्नीला कौटुंबिक पेन्शन नाकारली जाऊ शकत नाही. कौटुंबिक पेन्शन ही एक सरकारी योजना आहे. या योजनेद्वारे घरातील सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत दिली जाते. यानुसार जरी पत्नी फौजदारी खटल्यात दोषी असेल, तरी ती कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र आहे.
बलजीत कौर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. बलजीत कौर या पंजाब येथील अंबाला येथील रहिवाशी आहेत. बलजीत कौर यांचे पती तरसेम सिंह हरियाणा सरकारमधील कर्मचारी आहेत. त्यांचा 2008 मध्ये मृत्यू झाला होता. यानंतर त्यांचा मृत्यू झाला नसून 2009 मध्ये त्याचा खून झाल्याचे समोर आले. याप्रकरणी त्याची पत्नी हिच मुख्य आरोपी असल्याचे समोर आलं.
बलजीत कौर यांना 2011 पर्यंत नवऱ्याची पेन्शन मिळत होती. मात्र तिच्यावरील आरोप सिद्ध झाल्यावर हरियाणा सरकारने ही पेन्शन देणं बंद केलं होतं. याविरोधात बलजीत कौर यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारचा निर्णय नाकारला आहे. तसेच संबंधित विभागाला सर्व थकबाकीसह दोन महिन्यात याचिकाकर्त्याला पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत.
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला सीसीएस (पेन्शन) नियम 1972 तंर्गत कौटुंबिक पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. विशेष म्हणजे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जरी त्याची पत्नीने पुन्हा लग्न करते, तरीही ती कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र आहे. (Haryana Punjab HC On Pension Decision)
संबंधित बातम्या :
मुंबईनंतर आता कर्नाटकचा शिवाजी महाराजांवर दावा; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांने तोडले तारे
Corona vaccine | कोरोनाला थोपवण्यासाठी सीरमची आणखी एक लस, जूनमध्ये लॉन्च होण्याची शक्यता