“…तर मी कधीच मॉडेल झालो नसतो, आमच्या पिढ्यांना भारताइतकं स्वातंत्र्य कधीचं मिळालं नाही”
आता तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तिथ राहणाऱ्या 12-13 वर्षांच्या मुलींसोबत लग्न केली जातील आणि तिथल्या लोकांचा प्रचंड छळही केला जाईल, अशी भीती हाशाम खुर्शिदी व्यक्त करतो. आता संपूर्ण जगानं आम्हाला मदत करावी, असही आवाहन तो करतोय.
नवी दिल्ली: तालिबानी दहशतवाद्यांनी अफगणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तिथे हाहाकार माजलाय. जुलमी तालिबानी राजवटीतून बाहेर पडण्यासाठी अफगाण नागरिक शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. मात्र, यामध्ये शेकडो जण मृत्यूमुखी पडत आहेत. एकीकडे काबूलचा पाडाव झाला असला तरी आपल्या देशाच्या राजधानीत वसलेल काबूल आता चांगलच स्थिरावलय. हाशाम खुर्शिदी हा तरूण याच एका रिफ्युजींपैकी तो म्हणतो मी इथं आलो नसतो तर कधीच मॉडेल झालो नसतो.
मोदी सरकारचे आभार
दिल्लीच्या लाजपतनगर, जंगपुरा भोगल या भागात हजारोंच्या संख्येनं अफगाण निर्वासित स्थिरावलेत. दिवसेंदिवस इथ वाढणाऱ्या रिफ्युजींच्या रहिवासी संख्येमुळं इथल सगळं स्थानिक मार्केटही वाढत जातय. अफगाणी खाण -पानं त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तूंची दुकानं या सगळ्या गोष्टी इथं मिळतात. तालिबानं कब्जा केल्यानंतर आता आमच्या लोकांना इथं येण्यासाठी मोदी सरकारनं मदत केल्याबद्दल अनेक जण धन्यवाद मानताना दिसत आहेत.
जगानं आम्हाला मदत करावी
हाशाम खुर्शिदी हा तरूण याच एका रिफ्युजींपैकी एक आहे मूळ अफगाणिस्तानचा असलेला हाशाम प्रोफेशनल मॅाडेल आहे. आमच्या पिढ्यांना एवढ मोठ स्वातंत्र्य कधीच मिळाल नाही. तेवढं सगळ आम्हाला भारतात मिळत असल्याचही त्यान आवर्जून सांगितलं. इथ आलो नसतो तर मी मॅाडेल कधीच झालो नसतो. तालिबान्यांनी हे कधीच होऊ दिल नसत हे सांगताना त्याचा कातरस्वर लक्षात येतो. आता तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तिथ राहणाऱ्या 12-13 वर्षांच्या मुलींसोबत लग्न केली जातील आणि तिथल्या लोकांचा प्रचंड छळही केला जाईल, अशी भीती हाशाम खुर्शिदी व्यक्त करतो. आता संपूर्ण जगानं आम्हाला मदत करावी, असही आवाहन तो करतोय.
View this post on Instagram
दिल्लीत लाजपतनगर, जंगपुरा भागल, हौज रानी परिसरात 15 हजारांच्या आसपास अफगाण निर्वासित वास्तव्याला आहेत. उपचारासाठी आणि शिक्षणासाठी भारतात येणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. हॅाटेल, मॅाडेलिंग सारख्या क्षेत्रात अफगाण तरूण तरूणींच प्रमाण जास्त असल्याचंही दिसून येतं. 1000 पेक्षा जास्त तरूण मॅाडेलिंग क्षेत्रात काम करत असल्याची माहिती हाशाम यानं दिली.
इतर बातम्या:
“अश्रफ गनी न लढताच पळाले त्यांना प्रश्न विचारा”, अफगाण स्थितीवर जो बायडन नेमकं काय म्हणाले?