तो रोज चोरी करायचा, पण एका मिरचीने केले त्याचे वांदे… मुलीने घेतला बदला
ऑफिसच्या दुपारच्या वेळात रोज तिचा एक सहकारी तिचा टिफिन फस्त करायचा. ऑफिसमध्ये काम करत असताना मी सहसा दुपारचे जेवण सकाळी फ्रिजमध्ये ठेवायचे. मात्र, नेहमी जेवणाच्या वेळेत त्याची चोरी होत असे.
नवी दिल्ली | 13 जानेवारी 2024 : साधारणपणे ऑफिसमध्ये काम करणारी माणसे दुपारचे जेवण सोबत घेऊन जातात जेणेकरून त्यांना बाहेरचं खावं लागू नये. अशा परिस्थितीत लोक जेवणावेळी सहकाऱ्यांसोबत एकत्र बसून जेवतात. पण, एका मुलीबाबत नेहमी वेगळंच घडायचं. ती ऑफिसमध्ये दर रोज दुपारचे जेवण तर आणायची. परंतु, लाच टाईम झाला की तिचा टिफिन खाली असायचा. दुपारचे जेवण तिला कधीच मिळाले नाही. कारण, तिचे जेवण रोज चोरीला जायचे. त्या मुलीने आपल्यासोबत काय घडले आणि त्या चोराला पकडून कस बदला घेतला याचा मजेदार किस्सा सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
ऑफिसच्या दुपारच्या वेळात रोज तिचा एक सहकारी तिचा टिफिन फस्त करायचा. ऑफिसमध्ये काम करत असताना मी सहसा दुपारचे जेवण सकाळी फ्रिजमध्ये ठेवायचे. मात्र, नेहमी जेवणाच्या वेळेत त्याची चोरी होत असे. अशा परिस्थितीत चोराला रंगेहाथ पकडायचे, असे मी ठरवले असे ही मुलगी म्हणते.
त्या मुलीने पुढे लिहिले की, एक दिवस मार्केटमध्ये भाजी खरेदी करता असताना हबनेरो मिरची मला दिसली. ती मिरची पाहून मला चोराच्या सूडाची कल्पना आली. मी ती मिरची लगेच खरेदी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हबनेरो मिरचीने भरलेला एक अप्रतिम चिकन बुरिटो तयार केला. तो टिफिनमध्ये भरला. ऑफिसमध्ये गेल्यावर नेहमीच्या जागी टिफिन नेऊन ठेवला.
काम करत असताना मला माझ्या एक सहकारी सतत खोकताना दिसला. मी ताबडतोब फ्रीज तपासला. माझे दुपारचे जेवण गायब असल्याचे आढळले. मला समजले की हे त्याचेच काम आहे. काही वेळाने त्याचा खोकला वाढला. त्याला उलट्या झाल्या. पण, मला त्याचा अजिबात पश्चात्ताप झाला नाही. कारण यावेळी त्या चोरट्याने माझ्या जेवणात सूडाची चव चाखली होती. आता तो दिवसभर टॉयलेटमध्ये बसेल अशी पोस्ट त्या मुलीने Reddit वर लिहिली आहे.
महिलेच्या या कथेवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमच्यासोबतही कामाच्या ठिकाणी असे घडले आहे. आम्हीही असाच बदला घेतला आहे. हा धडा शिकवणे गरजेचे आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. काही लोकांनी बदला घेण्याचे समर्थन केले. तर काहींनी अशा सहकाऱ्यांना जेवणाची चोरी केल्याबद्दल नोकरीतून काढून टाकले पाहिजे. असा नियम करायला हवे असे म्हटले आहे.