इंग्लंडमध्ये घातक कोरोना, दिल्लीत तातडीची बैठक, विमान प्रवासावर पुन्हा संकट?
भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. (Coronavirus Strain Air Travel Ban)
नवी दिल्ली: भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूनचे नवे रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे (Coronavirus Strain) नेदरलँड, बेल्जियम, इटली आणि जर्मनीने यूकेमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी घातली आहे.
ब्रिटनचे आरोग्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी कोरोना विषाणूचे नवे रुप पहिल्या विषाणूपेक्षा वेगळे असेल, असं सांगितले. या विषाणूचा वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आवाहन क्रिस व्हिटी यांनी केले आहे. ब्रिटनने यापूर्वीच इतर देशांनी विमानसेवांवर बंदी घालण्याबाबत सुचवले होते.
भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus Strain) नवं रुप आढळल्यानंतर भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जेएमजीची(Joint Monitoring Group) तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रुपातील स्ट्रेन वेगाने संसर्ग पसरवत आहे. भारत सरकार याबाबत सतर्क झाले असून आरोग्य सेवा महानिर्देशक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात.
बीबीसीचे आरोग्यविषयक पत्रकार जेम्स गैलेगर यांनी याबाबत एक सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचे बदलणे स्वाभाविक प्रक्रि्या आहे. संसर्ग वेगानं होण्यासाठी विषाणूमध्ये असे बदल होत असतात, असं जेम्स गैलेगकर यांनी सांगितले. जेम्स यांनी प्रयोगशाळेत अभ्यास केल्यानंतर कोरोनाचे नवीन स्ट्रेन किती गंभीर आहे, हे समजेल असं सांगितले. कोरोना वॅक्सिन नव्या स्ट्रेनवर परिणाम करेल की नाही, हे पाहावं लागेल, असंही त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचे नवे रुप (Coronavirus Strain) ज्या ठिकाणी वाढले आहे त्या ठिकाणी कोरोना संसर्ग वेगाने वाढले आहे, याचा अभ्यास करणं शास्ज्ञत्रांपुढील आव्हान असल्याचं गैलेगर यांनी म्हटले.
लंडनसह शहरासह इतर ठिकाणी निर्बंध
ब्रिटनमध्ये नव्यानं आढळलेल्या कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) लंडन, साऊथ इंग्लंडमधील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे ख्रिसमस आणि इतर सण पहिल्यासारखे साजरे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
ब्रिटनमध्ये पसरतोय नव्या रुपातील कोरोना (Coronavirus Strain)
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणूचं नवे रुप आढळून आले असल्याचं स्पष्ट केले. कोरोनाचे नवे वेरियंट(स्ट्रेन) देशात पसरत आहे. यामुळे रुगणालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती बोरिस जॉन्सन यांनी दिली. रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यूंची संख्या वाढलेली नाही. कोरोना विषाणू संसर्गाचे स्वरुप बदलले असेल तर आपल्याला देखील रणनिती बदलली पाहिजे, असं जॉन्सन यांनी स्पष्ट केले.
ब्रिटन सरकारकडून कोरोना विषाणूच्या स्वरुपाविषयी जागतिक आरोग्य संघटनेला माहिती देण्यात आली आहे. इतर देशांना ब्रिटनच्या नागरिकांवर प्रवासाला बंदी घालायची असल्यास त्याबाबत निर्णय घेण्यासाठी याची मदत होणार आहे, असंही ब्रिटन सरकारच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
भारतात जानेवारीमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा
(Health Ministry meeting after mutant coronavirus strain in UK air travel will be ban)