Video : शिमल्यात मुसळधार पावसाचा कहर, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे आणि दुकानांचे वाहून गेले
Himachal Pradesh Weather Update : हवामान खात्याने अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेशात १० जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे.
शिमला : हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh Rain Update) राजधानी शिमलामध्ये (shimala rain update) मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश राज्यात अनेक जिल्ह्यात भूस्खलनच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसानं झालं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला आहे. मंडीच्या थुनाग बाजार परिसरात सगळीकडं रस्त्यावर पावसाचं पाणी दिसत आहे. मंडी जिल्ह्यातील ओनैर गावातील थुनाग बाजार परिसरातील घाणेरड्या पावसाच्या पाण्याने झाडे वाहून गेली आहेत. त्यामुळे अनेकांच्या घराचं आणि दुकानाचं नुकसान झालं आहे.
त्या व्हिडीओमध्ये थुनाग बाजारात पावसामुळे किती भयानक स्थिती निर्माण झाली आहे, हे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये घर, झाडं पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तिथल्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं, की पाऊस सुरु असताना अचानक ढगफुटी झाली. त्यावेळी काही झाडं उन्मळून पडली. तो रस्ता बंद करण्यात आला आहे, त्याचबरोबर रस्त्यातल्या अडचणी दूर करण्याचं काम सुरु आहे.
More Scary visuals from Thunag area of Mandi, Himachal#Thunag #Mandi #HimachalPradesh #Manali #Kullu pic.twitter.com/qtyyo3OHcD
— Anil Thakur (@Ani_iTV) July 9, 2023
दहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील १० जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे काही दिवस तिथं मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी पुढचे २४ तास लोकांनी घराच्या बाहेर पडू नये असा आदेश दिला आहे. त्याचबरोबर त्या भागातल्या आमदारांना कॅम्प आयोजित करुन लोकांना मदत आदेश सु्ध्दा दिले आहेत. “कृपया या आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करा आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई होईल याची खात्री करा.”