High Court : ‘कमावत्या’ पत्नीचीही जबाबदारी झटकता येणार नाही; नवरोबांना कोर्टाचा ‘दे धक्का’

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा आणि न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. रोजच्या संसारात होणाऱ्या भांडणानंतर पतीने पत्नीला पैसे देण्यास टाळाटाळ केली होती. पत्नीला मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत यासाठी पतीने नाना प्रकारचे बहाणे केले.

High Court : 'कमावत्या' पत्नीचीही जबाबदारी झटकता येणार नाही; नवरोबांना कोर्टाचा 'दे धक्का'
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 8:19 PM

नवी दिल्ली : पत्नी नोकरी करते. त्यामुळे ती स्वतःच्या पगारातून स्वतःचा खर्च भागवू शकते, असा विचार करून तिची जबाबदारी झटकणाऱ्यांना एका न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. पत्नी (Wife) नोकरी करून पैसे कमावत असली तरी पती (Husband) तिच्या देखभालीची, सांभाळ करण्याची, तिच्या गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी झटकू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाने पत्नीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करताना कंजुषी करणाऱ्या नवरोबांना मोठा धक्का बसला आहे, तर महिला वर्गांसाठी न्यायालयाने हा निर्णय मोठा दिलासादायक मानला जात आहे. (High court ruling that husband cannot discharge his responsibilities even if wife is employed)

कायद्यापुढे ‘दूध का दूध’ आणि ‘पानी का पानी’!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा आणि न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. रोजच्या संसारात होणाऱ्या भांडणानंतर पतीने पत्नीला पैसे देण्यास टाळाटाळ केली होती. पत्नीला मर्यादेपेक्षा जास्त पैसे देऊ नयेत यासाठी पतीने नाना प्रकारचे बहाणे केले. स्वतःचा पगार अर्ध्याहून अधिक कमी करून दाखवला. तसेच कोरोना महामारीच्या नावाखाली आपली कायमस्वरूपी नोकरी ‘तात्पुरती’ असल्याचे सांगितले. तसेच स्वतःला अजून दोन भाऊ आहेत, असे असतानाही त्याने पेन्शन मिळालेल्या आई-वडिलांचा सर्व खर्च स्वत:ला झेलावा लागत असल्याचा दावा केला. त्याचबरोबर आपण भाड्याच्या घरात राहत आल्याचेही सांगितले. न्यायालयात पत्नीबद्दलही त्याने माहिती दिली. पत्नी शिकलेली आहे. ती गृहिणी असली तरी शिकवणीतून चांगली कमाई करत आहे, याकडे पतीने न्यायालयाचे लक्ष वेधले. पण, कायद्यापुढे ‘दूध का दूध’ आणि ‘पानी का पानी’ झाले. पतीने केलेला प्रत्येक दावा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

पती पत्नीच्या पालनपोषणाच्या जबाबदारीतून हात झटकू शकत नाही

महिलेच्या अपीलचा न्यायालयाने स्वीकार केला. पत्नी काहीतरी कमावते आहे. असे असले तरी पती तिच्या पालनपोषणाच्या जबाबदारीतून हात झटकू शकत नाही, असे न्यायालय म्हणाले. न्यायमूर्ती कृष्णा आणि न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी आपल्या निकालात म्हटले की, ज्या व्यक्तीला वेबसाइट डिझाइनिंगशी संबंधित तांत्रिक ज्ञान आहे. त्या व्यक्तीला कंपनीत रु. 70,000 ची नोकरी मिळते आणि 1 जून 2017 नंतर अचानक त्या व्यक्तीचा पगार निम्म्याहून कमी होतो. हे कसे शक्य आहे? हे समजून घेणे कठीण आहे. पतीच्या दाव्यातील सर्व विरोधाभास शोधून उच्च न्यायालयाने पत्नीच्या बाजूने निकाल दिला. (High court ruling that husband cannot discharge his responsibilities even if wife is employed)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.