AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओवेसीनं उच्च न्यायालयालाच निकालात काढलं; ते म्हणाले मी बोलणारच पण जरा थांबा…

हिजाब प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला आहे. भाजपने हिजाब वाद विनाकारण तापवला असल्याचे म्हटले आहे.

ओवेसीनं उच्च न्यायालयालाच निकालात काढलं; ते म्हणाले मी बोलणारच पण जरा थांबा...
ओवीसी यांचा बिकनीवर सवाल
| Updated on: Oct 13, 2022 | 5:37 PM
Share

नवी दिल्लीः हिजाब प्रकरणावर (Hiajb Issue) कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तो निर्णय योग्य नसल्याचे मत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी गुरुवारी व्यक्त केले. या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होईल असे वाटत होते मात्र पूर्ण झाली नाही असं मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र एका न्यायमूर्तीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या बाजूने आला असून उच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

हा निकाल देताना कुराणाच्या भाषेचाही गैरवापर केला असल्याचे तमत व्यक्त करत हे असे घडायला नको होते, असंही त्यांनी सांगितलं.

ओवेसी पुढे म्हणाले की, कर्नाटकातील मुस्लीम मुली हिजाब घालतात कारण कुराणातमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे. असे सांगत असतानाच अल्लाहने तिला हिजाब घालण्याचाही आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हिजाब प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला आहे. भाजपने हिजाब वाद विनाकारण तापवला असल्याचे म्हटले आहे. कारण नसताना त्यावर बंदी घातली असून याबाबतचा सगळा निकाल जाहीर होण्याची मी वाट बघतोय.त्यानंतर मी सविस्तर मत व्यक्त करणार असल्याचे म्हटले आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी खंडित करणार निकाल असल्याचे म्हटले आहे. हे संवेदनशील प्रकरण सरन्यायाधीशांकडे पाठवले कारण महत्वाचा निर्णय देण्यासाठी खंडपीठ स्थापन केले जाईल.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्याबाबतचा राज्य सरकारकडून आदेश कायम ठेवला होता असंही ते म्हणाले.

त्याचवेळी न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी त्याचा स्वीकार करत शेवटी निवडीचा विषय असल्याचेही त्यांनी सांगितले. हिजाब घालणे हा इस्लाममधील सक्तीच्या धार्मिक प्रथेचा भाग नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने बंदी उठवण्यास नकार दिला होता असंही त्यांनी स्पष्ट केले. न्यायमूर्ती धुलिया यांनी या निकालाविषयी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणावरच आम्ही भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी शिक्षणावरच अधिक भर दिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समानता, अखंडता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली होती असंही त्यांनी स्पष्ट केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.