Marathi News National Hindu Sikh face off over 'Lalsingh Chadha' in Punjab, Hindu organizations stop movie, Sikhs come out in support of Aamir
Lal Singh Chaddha: पंजाबमध्ये ‘लालसिंह चड्ढा’वरुन हिंदू-शिख आमनेसामने, हिंदू संघटनांनी सिनेमा थांबवला, तर आमीरच्या समर्थनार्थ उतरले शिख
शिख संघटनांचे म्हणणे आहे की, लालसिंह चड्ढा सिनेमा एका शिख पात्रावर आधारित आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा अधिकार हिंदू संघटनांना नाही. दोन प्रमुख समुदायांचे लोक एकमेकांसमोर आल्याने, यामुळे जालंधरमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
सिनेमावरुन पंजाबात वादImage Credit source: social media
जालंधर – अभिनेता आमीर खान याच्या लालसिंह चड्ढा (Lal Singh Chaddha) या सिनेमावरुन पंजाबात हिंदू आणि शिख (Hindu vs Sikh) संघटना आमनेसामने आल्या आहेत. हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याच्या कारणावरुन हिंदू संघटनांनी आमीर खान (Amir Khan)आणि त्याच्या सिनेमाचा विरोध सुरु केला आहे. तर शिख संघटना आमीर खानच्या बाजूने मैदानात उतरल्याचे दिसते आहे. शिख संघटनांचे म्हणणे आहे की, लालसिंह चड्ढा सिनेमा एका शिख पात्रावर आधारित आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा अधिकार हिंदू संघटनांना नाही. दोन प्रमुख समुदायांचे लोक एकमेकांसमोर आल्याने, यामुळे जालंधरमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
‘Lal Singh Chaddha’ became Hindu vs Sikh in Punjab: Sikhs came out in support of Amir and opposed to Hindu organizations; Said – show the film closed https://t.co/h5IY2T2fK4
आमीर खान याचा सिनेमा लालसिंह चड्ढा गुरुवारी रीलिज झाला. जालंधरमध्ये हा सिनेमा एमबीडी मॉलमधील पीव्हीआर सिनेमात लावण्यात आहे. गुरुवारी सकाळी सिनेमा सुरु होताच शिवसेना आणि इतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मॉलबाहेर जमा झाले. यात शिवसेना हिंद, समाजवादी, शिवसेना बाळ ठाकरे, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. ही सगळी स्थिती पाहता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अनेक तास झालेल्या गोंधळानंतर आणि विरोधानंतर अखेरीस लालसिंह चड्ढाचा खेळ बंद करण्यात आला.
शिख संघटनांनी दिला सिनेमाला पाठिंबा
खेळ बंद झाल्यानंतर हिंदू संघटनांचे नेते मॉलमधून गेल्यानंतर शिख समन्वय समितीचे पदाधिकारी मॉलमध्ये दाखल झाले. पोलिसांनी थांबवल्यानंतरही, त्यांना न जुमानता हे सगळे पीव्हीआरमध्ये दाखल झाले. त्यांनी हे खेळ थांबवण्याची गरज नसल्याचे पीव्हीआरच्या व्यवस्थापनाला बजावले. हा सिनेमा कोण थांबवतो, हे पाहू असे आव्हानही या शिख संघटनांनी दिले.
वातावरण बिघडवण्याचा आरोप
शिख समन्वय समितीने शिवसेनेवर वातावरण कलुषित करत असल्याचा आरोप केला आहे. आमीर खानच्या प्रचारासाठी किंवा त्याने कलेल्या चांगल्या कामांची यादी वाचण्यासाठी शिख संघटना इथे आलेल्या नाहीत, हे शिख संघटनांनी स्पष्ट केले आहे. मात्र सिनेमात आमीर खान एका शिखाची भूमिका करीत आहे. जर त्याचा कुणी विरोध करत असेल तर त्याविरोधात संघर्ष करण्याची तयारी असल्याचे शिख संघटनांनी स्पष्ट केले आहे. शिख संघटनांनी हा सिनेमा पाहिल्यानंतरच या सिनेमाला मंजूरी देण्यात आली, असा दावाही संघटनांनी केला आहे. जर या सिनेमाला शिख संघटनांचा विरोध नाही तर विरोध करणारी शिवसेना कोण, असा सवालही या संघटनांनी उपस्थित केला आहे. जर हिंदू संघटनांचा आमीर खान याला विरोध असेल तर २०१६ सालीच पीके सिनेमाचा विरोध हिंदूत्ववादी संघटनांनी करायला हवा होता, अशी भूमिकाही शिख संघटनांनी घेतली आहे. आमीर खान याचे सिनेमे हे काहीतरी संदेश देणारे असतात. त्यांच्यातून अव्यवस्थेवर भाष्य केलेले असते. आमीर जी भूमिका करतो, त्यात तो पूर्णपणे समरसून ती भूमिका निभावतो. लालसिंह चड्ढामध्येही त्याने नकली दाढी न लावता खरी दाढी वाढवली आणि पूर्णपणे शिखांचा बाणा अनुसरून त्याने ही भूमिका केली, असे शिख संघटनांचे म्हणणे आहे.
लालसिंह थांबवून दाखवा, शिवसेनेला आव्हान
जालंधरच काय तर पूर्ण पंजाबात कुठेही हा सिनेमा थांबवून दाखवा, असे आव्हान शिख समन्वय समितीने शिवसेनेला दिलेले आहे. ही मंडळी कुठेही विरोधासाठी येऊन उभी राहतात, यांची गुंडगिरी खपवून घेणार नसल्याचेही शिख संघटनांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शिवसेनेने या मुद्द्यावर स्पषीटकरण दिले आहे. विरोध सिनेमाला नसून आमीर खान याला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २०१६ मध्ये केलेल्या पीके सिनेमात आमीरने हिंदू देवदेवतांचा अपमान केला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आमीर खान याचा विरोध करायचा असे हिंदू संघटनांनी ठरवले होते, असेही शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.