AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिजबुल कमांडर तालिबला बंगळुरुतून अटक, जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कामगिरी, टार्गेट किलिंगमध्ये सामील असलेले 47 मोड्यूल उध्वस्त

सध्या तालिब हा बंगळुरुत लपून बसला होता. त्या ठिकाणी जाून जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात हा दहशतवादी पुन्हा सक्रिय होत होता, त्यामुळे त्याची अटक हे मोठे यश असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिजबुल कमांडर तालिबला बंगळुरुतून अटक, जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कामगिरी, टार्गेट किलिंगमध्ये सामील असलेले 47 मोड्यूल उध्वस्त
Hijbul commander talib arestImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:36 PM

बंगळुरु – जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu kashmir Police)मोठी कारवाई करत, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर (Hijbul Mujahidin)तालिब हुसैन (Talib)याला बंगळुरुतून अटक केली आहे. १७ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हे यश मिळाले आहे. काश्मीरमधील किश्तवाड परिसरात नव्याने भरती करत दहशतवाद्यांना पुन्हा संघटित करण्य़ास आणि संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली होती. कमांडर तालिब हा बराच काळ किश्तवाडमध्ये सक्रीय होता. सध्या तालिब हा बंगळुरुत लपून बसला होता. त्या ठिकाणी जाून जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात हा दहशतवादी पुन्हा सक्रिय होत होता, त्यामुळे त्याची अटक हे मोठे यश असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तालिबला अटक झाल्याने काश्मिरातील दहशतवाद कमी होईल असा विश्वासही पोलिासंनी व्यक्त केला आहे.

टार्गेट किलिंग प्रकरणीही कारवाई सुरु

टार्गेट किलिंग करणाऱ्यांची ओळख पडली असून, त्यांच्यावर कारवाी करण्यात येत असल्याचेही जम्मू काश्मीरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जे दहशतवादी मॉड्यूल्स आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते आहे. आत्तापर्यंत अशा 47 मॉड्यूल्सवर कारवाई करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. जे या टार्गेट किलिंगमध्ये सहभागी होते, सक्रिय होते, त्यांच्यापैकी अनेकांना मारण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या 5 महिन्यांत या मॉड्यूल्सवर मोठी कारवाई करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा प्रकारेच त्यांमा मदत करणाऱ्या हत्यारे पोहचवणारे, बाईकवरुन नेणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खुलेआम हत्यार घेऊन फिरत होता तालिब

5 मुलांचा पिता असलेला तालिब हिजबुलमध्ये सक्रिय झाल्यानंतर, हत्यारे घेऊन फिरत असे, त्याच्याबरोबर सक्रिय झालेले इतरही काही दहशतवादी किश्तवाड जिल्ह्यात फिरत असत. त्याच्या कुटुंबाने अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन, तालिबने हिंसेचा मार्ग सोडून मुख्य धारेत परतावे यासाठी मदत मागितली होती.

हे सुद्धा वाचा

2016 पासून होता निशाण्यावर

किश्तवाड हा जम्मूतील एकमेव जिल्हा असा होता की जिथे हिजबुल दहशतवाद्यांच्या कारवाया जोरात सुरु होत्या. तालिब हा एकमेक सर्वाधिक काळ जिवंत राहिलेला दहशतवाद्यांमध्ये तालिबचा समावेश आहे. तालिब हा स्थानिक आदिवासींमधील होता. त्याला डोंगरातील रस्ते परिचित होते. 2016 पासून तो गूढरित्या गायब होत असे. त्यानंतर काही दिवसांनी तो दहशतवाद्यांमध्ये सक्रिय असल्याचे समजले तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता.

पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....