रेल्वेत वस्तू विसरलात, परत मिळवायचंय? वापरा ‘ही’ ट्रिक !
रेल्वे प्रशासन गाडीत राहिलेल्या तुमच्या बॅगेचं किंवा एखाद्या वस्तूचं काय करते? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (how can get lost bag or Items in train).
मुंबई : रेल्वे प्रवास करताना एखादी वस्तू किंवा बॅग रेल्वेत चुकून राहून गेली तर तुम्ही काय करता? बऱ्याचदा आपण ती वस्तू सोडून देतो. मात्र, ती वस्तू जर जास्त महागडी असेल तर तुम्ही काय कराल? याचबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. याशिवाय रेल्वे प्रशासन गाडीत राहिलेल्या तुमच्या बॅगचं किंवा एखाद्या वस्तूचं काय करते? याबाबतही माहिती देणार आहोत (how can get lost bag or Items in train).
रेल्वेत राहिलेलं सामान मिळवण्यासाठी काय करावं?
रेल्वेत राहिलेलं एखादं सामान किंवा बॅग परत मिळवण्यासाठी सर्वात आधी रेल्वे पोलिसात तक्रार करावी. तसं केल्यास कदाचित तुम्हाला तुमची वस्तू तातडीने किंवा लवकर मिळेल. तुम्ही ज्या रेल्वे स्टेशनवर उतरला आहात त्याच रेल्वे स्टेशनवर आरपीएफकडे आपलं सामान गाडीत राहिल्याची तक्रार करावी. याबाबत तुम्ही एफआरआयदेखील दाखल करु शकता. या तक्रारीनंतर तुमची वस्तू तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी असते. तुमचं सामान तुम्ही सांगितलेल्या सीटवर मिळालं तर ते सामान तातडीने रेल्वे पोलीस ठाण्यात जमा केलं जातं.
त्यानंतर तक्रारदाराला संबंधित रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन आपली वस्तू घ्यायला जावं लागेल. बऱ्याचदा रेल्वे पोलीस तक्रार केलेल्या पोलीस ठाण्यातही ती वस्तू घेऊन येतात. तक्रारदार आपले कागदपत्र दाखवून ते मिळवू शकतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी तक्रारदाराच्या घरापर्यंत ते सामान पोहोचवण्याची सुविधा केली जाते (how can get lost bag or Items in train).
रेल्वे प्रशासन तुमच्या सामानाचं काय करतं?
तुम्ही जर रेल्वे गाडीत सामान विसरलात तर ते सामान रेल्वे कर्मचारी स्टेशन मास्टरकडे सुपूर्द करतात. त्या सामानात जर सोन्याचे दागिने असतील तर ते दागिने 24 तासांसाठी स्टेशन मास्टरच्या कार्यालयातच ठेवले जातात. या चोवीस तासात कुणी व्यक्ती त्या वस्तूवर क्लेम करते तर ते सामान त्या व्यक्तीला दिलं जातं. अन्यथा ते सामान पुढच्या जोनल ऑफिसला पाठवण्यात येतं.
तर, दुसऱ्या सामानासाठी तीन महिन्यांचा कालावधी असतो. रेल्वे अधिकारी ते सामान तीन महिने स्वत:कडे ठेवतात. त्यानंतर ते सामान पुढे पाठवलं जातं. अनेक वस्तूंना विकण्याबाबतचे देखील नियम आहेत. पण त्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. वेगवेगळ्या सामानासाठी वेगवेगळे नियम आहेत.
हेही वाचा : मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींना सर्वाधिक पसंती; मिथुन चक्रवर्ती, सौरव गांगुलीही रेसमध्ये!