Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. (how did chirag paswan's ljp playe role in pushing nitish kumar's jdu)

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले 'जाएंट किलर'!
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 8:19 PM

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येताना दिसत आहे. तर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं चित्रं आहे. ऐनवेळी लोजपा नेते चिराग पासवान यांनी एनडीएतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवल्याने त्याचा फटका भाजपऐवजी नितीशकुमार यांनाच सर्वाधिक बसल्याचं दिसत आहे. पासवान यांच्या हाती यश आलं नसलं तरी त्यांनी जेडीयूची मते खेचून राज्यात नंबर वन होण्याचं नितीशकुमार यांचं स्वप्न त्यांनी भंग केलं असून पासवान हे खऱ्या अर्थाने बिहारमध्ये जाएंट किलर ठरले आहेत. (how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

हाती आलेल्या कलानुसार भाजपने 73 तर राजदने 64 जागांवर आघाडी घेातली आहे. तर जेडीयूने 49 जागांवर आघाडी घेतली आहे. चिराग पासवान यांच्या लोजपाला अवघ्या एका जागेवर आघाडी घेता आली आहे. मात्र, लोजपाला 5.8 टक्के मते मिळविण्यात यश आलं आहे. भाजपला आतापर्यंत 19.8 टक्के आणि जेडीयूला 15.4 टक्के मते मिळाली आहे. तर, आरजेडीला 22.9 टक्के मते मिळाली आहेत. जर लोजपाने जेडीयूच्या विरोधात उमदेवार दिले नसते तर जेडीयू बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला असता, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

चिराग पासवान यांनी जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले. त्यामुळे महादलित मतांची विभागणी झाली. त्याचा सर्वाधिक फटका जेडीयूला बसला आहे. मागच्या निवडणुकीत नितीशकुमार यांनी महादलित हा नवा वर्ग केला होता. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला होता तर रामविलास पासवान यांना नुकसान झालं होतं. मात्र, पाच वर्षानंतर हे चित्रं उलटलं असल्याचं पाह्यला मिळत आहे. त्याशिवाय संपूर्ण निवडणुकीत चिराग यांनी आपण भाजपचे समर्थक असून निकालानंतर भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेही चिराग यांचा लोजपा भाजपची बी टीम असल्याचा मेसेज गेला होता. त्याचाही परिणाम पाह्याला मिळाला आहे. जाणकारांच्या मते, लोजपाच्या 6 टक्के मतांपैकी 3 टक्के मतेही एनडीएला मिळाली असती तर नितीशकुमार यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असताच शिवाय एनडीएचा सरकार बनविण्याचा मार्गही सोपा झाला असता.

या आठ जागा गमावल्या

महुआ विधानसभा मतदारसंघात लोजपा उमेदवाराने 12 हजार मते घेतल्याने तिथे जेडीयूचा पराभव झाला. मटिहानी येथे लोजपाने 26 हजार मते घेतल्याने जेडीयूच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली आहे. महिषीमध्ये लोजपाने 7 हजार, जहानाबादमध्ये लोजपाने 20 हजार, कुर्था येथे 8 हजार, नोखा येथे 11 हजार आणि सासाराममध्ये 12 हजार मते घेऊन जेडीयूच्या उमेदवारांचा पराभव केला. दिनारामध्ये मात्र जेडीयूच्या उमेदवाराने 21 हजार मते घेतल्याने लोजपा उमेदवाराचा पराभव झाला. इथे लोजपाला 46 हजार तर आरजेडीच्या उमेदवाराला 50 हजार मते मिळाले होते.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु

माजी मुख्यमंत्र्यांकडून माजी विधानसभा अध्यक्षांचा पराभव, जीतन राम मांझी 16 हजार 717 मतांनी विजयी

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

(how did chirag paswan’s ljp playe role in pushing nitish kumar’s jdu)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.