हिंदू-बौद्धांच्या लक्षद्वीपाचं कसं झालं इस्लामीकरण, इतिहास काय सांगतो?

लक्षद्वीप हा छोट्या बेटांचा समुह जगापासून दुर्लक्षित होता. या बेटावर 64 हजार लोकसंख्येपैकी 62 हजार लोकसंख्या मुस्लीम आहे. परंतू ही बेटे पूर्वी मुस्लीम बहुल नव्हती. येथे हिंदू आणि बौद्ध धर्माचे अनुयायी रहात होते. काय आहे लक्षद्वीपचा इतिहास जाणून घ्या...

हिंदू-बौद्धांच्या लक्षद्वीपाचं कसं झालं इस्लामीकरण, इतिहास काय सांगतो?
LakshadweepImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 4:25 PM

मुंबई | 8 जानेवारी 2024 : लक्षद्वीप सध्या गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे डेस्टीनेशन ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौरा आणि शेजारी देश मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांवर अपमानास्पद टीपण्णी यानंतर सोशल मिडीयावर लक्षद्वीप सर्वाधिक सर्च केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावरील टीपण्णी नंतर मालदीवच्या मंत्र्यांच्या झालेल्या हक्कालपट्टीने तर यात भरच पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर आणि तेथील पर्यटनाला प्रोत्साहन देणारी पोस्ट सोशल मिडीयावर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मालदीवला झटका बसला आहे. यामुळे घाबरुन त्या ओघात मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेने त्यांना त्यांची पदे गमवावी लागली आहेत.

गुगलवर सर्वाधिक सर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर लक्षद्वीप हा गुगलवर सर्वाधिक सर्च होणारा किवर्ड ठरला आहे. अद्भूत नैसर्गिक सौदर्याचे वरदान असलेल्या लक्षद्वीपच्या पाहुणचाराबद्दल सोशल मिडीयावर रकानेच्या रकाने लिहीले जात आहेत. हजारो लोकांनी आपली मालदीवचा ट्रीप कॅन्सल केली आहे. सोशल मिडीयावर #BoycottMaldives हा हॅशटॅग ट्रेंड करीत आहे.

लक्षद्वीप बेटांचा इतिहास

हिंदू आणि बौद्ध लोकांची भूमि असलेल्या लक्षद्वीप बेट मुस्लीम बहुल कसे बनले ? याचा इतिहास काय ? असे मनात प्रश्न निर्माण झाले असतील तर लक्षद्वीपाचा इतिहास जाणून घेऊ यात. लक्षद्वीप भारताचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. 32 छोट्या बेटांचा हा समुह आता 36 बेटांचा आहे. लक्षद्वीपची सध्याची राजधानी कावारत्ती ( kavaratti ) आहे. येथील 96 टक्के जनता मुस्लीम असून इस्लाम धर्म मानते. परंतू आधी हे बेट मुस्लीम बहुल नव्हते. येथे हिंदू आणि बौद्ध धर्मियांचे प्राबल्य होते.

लक्षद्वीपला कसा पोहचला इस्लाम धर्म

लक्षद्वीपला इस्लाम धर्माची सुरुवात ई.स.631मध्ये सुफी संत उबैदुल्लाह यांच्या मुळे झाली. सरकारी दस्ताऐवजानूसार लक्षद्वीपला इस्लाम धर्माचे आगमन 7 व्या शतकात ई.स. 41 हिजरीच्या आसपास झाले असावे. या द्वीपसमुहात अमिनी, कल्पेनी एंड्रोट, कावारत्ती आणि अगत्ती सर्वात जुनी बेटं आहेत. राजा चेरामन पेरुमल याने ई.स. 825 मध्ये इस्लाम धर्मा आपलासा केला. अरबांशी व्यापारा निमित्ताने झालेल्या संपर्काने येथील जनतेवर इस्लाम धर्माचा प्रभाव झाला.

1956 मध्ये लक्षद्वीप केंद्र शासित बनला

11 व्या शतकात या बेटांवर शेवटचे चौल राजांचे आणि नंतर कन्नानोरच्या राजाचे शासन होते. त्यानंतर पोतूर्गाल आणि नंतर 16 व्या शतकात येथे चिरक्कल हिंदू शासकाचे नंतर अरक्कल मुस्लीम, त्यानंतर टीपू सुल्तान आणि नंतर ब्रिटीशांनी या बेटांवर राज्य केले. साल 1947 स्वातंत्र्यानंतर 1956 भाषावार प्रांत रचनेनंतर यास भारताच्या मद्रास प्रेसीडेंसीमध्ये सामील केले. त्यानंतर त्यास केरळ राज्यात सामील केले. त्यानंतर त्यास केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. लक्षद्वीपला आधी लॅकाडिव ( Laccadive ), मिनिकॉय ( Minicoy ) , आणि अमिनदीवी ( Amindivi ) नावाने ओळखले दातक होते. 1971 नंतर त्यास लक्षद्वीप असे नाव देण्यात आले.

लक्षद्वीप पर्यटकांपासून दूर

लक्षद्वीप आणि त्याचा किनारी प्रदेश पर्यटनापासून दुर्लक्षित होता. या बेटांची बहुतांशी लोकसंख्या एकूण 36 बेटांपैकी 9-10 बेटांवरच रहाते. त्यामुळे अनेक लक्षद्वीप बेटे आणि समुद्रकिनारे जगाच्या नजरेसमोर आलेले नाहीत. पर्यटकांपासून अज्ञात आहेत. देशातील अन्य राज्यातून येथे प्रवेश करण्याआधी लक्षद्वीप पर्यटन विभागाची परवानगी घ्यावी लागते. येथे प्रवास करताना रोख व्यवहार करावे लागतात, कारण येथील अनेक भागात इंटरनेट सेवा मर्यादीत असल्याने ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येतात. येथे भारताच्या राष्ट्रपतींचे शासन चालते.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.