Ship hijack rescue | हिंद महासागरात भारतीय नौदलाचा पराक्रम, मार्कोस कमांडोजने कसे वाचवले 15 भारतीयांचे प्राण?
Ship hijack rescue | भारतीय नौदलाच एलिट कमांडो युनिट मार्कोसने पुन्हा एकदा आपला पराक्रम दाखवून दिलाय. या कमांडो युनिटने सोमालियाच्या समुद्रात एमवी लीला नॉरफॉक या व्यापारी जहाजावर स्पेशल ऑपरेशन केलं. भारतीय नौदलाने आपल्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा या ऑपरेशन्ससाठी वापरल्या. हे सर्व ऑपरेशन कसं केलं? त्या बद्दल जाणून घ्या.
Ship hijack rescue | भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडोजने शुक्रवारी अरबी समुद्रात आपला पराक्रम दाखवला. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ फसलेल्या एमवी लीला नॉरफॉक जहाजाची समुद्री डाकूंच्या तावडीतून सुटका केली. या जहाजावर एकूण 21 जण होते. त्यात 15 भारतीयांसह सर्वांचे मार्कोस कमांडोजनी प्राण वाचवले. लायबेरियाचा झेंडा असलेले एमवी लीला नॉरफॉक जहाज ब्राझीलहून बहरीनच्या दिशेने चालले होते. त्यावेळी सोमालियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री डाकूंनी या जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न केला. पण पूर्णपणे अलर्ट असलेल्या भारतीय नौदलाने आपला पराक्रम दाखवत त्यांची योजना धुळीस मिळवून लावली.
सोमालियाच्या किनाऱ्यापासून 300 मैल अंतरावर या जहाजाच अपहरण करण्यात आलं. भारतीय नौदलाचे मार्कोस कमांडोज जहाजावर उतरले, त्यावेळी त्यावर एकही डाकू नव्हता. नौदलाच्या पेट्रोल एअरक्राफ्टच्या इशाऱ्यानंतर समुद्रा डाकूंनी आपली योजना गुंडाळून पळ काढला असावा, असं नौदलाकडून सांगण्यात आलं. मार्कोस कमांडोजने या जहाजातून प्रवास करणाऱ्या 21 जणांचे प्राण कसे वाचवले? त्या बद्दल जाणून घेऊया.
सर्वप्रथम हायजॅकची माहिती कोणाला मिळाली?
गुरुवारी 4 जानेवारीला जहाजाच अपहरण झाल्याची माहिती मिळाली. लायबेरियाचा झेंडा असलेले हे जहाज ब्राझीलहून बहरीनच्या दिशेने चाललं होतं. जहाजाच्या अपहरणाची पहिली बातमी यूनाइटेड किंगडम मॅरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स पोर्टलला (UKMTO) पाठवण्यात आली. पाच ते सहा सशस्त्र समुद्री डाकू जहाजात चढल्याची माहिती यामध्ये होती. भारतीय नौदलाला याची माहिती देण्यात आली.
INS चेन्नईने हायजॅक जहाजाला किती वाजता इंटरसेप्ट केलं?
भारतीय नौदलाला याची माहिती मिळताच लगेच Action सुरु झाली. जहाजाच्या मदतीसाठी भारतीय नौदलाने लगेच INS चेन्नई, पी-8आय आणि दूरवर नजर ठेवू शकणारे प्रीडेटर एमक्यू9बी ड्रोन तैनात केलं. INS चेन्नईने 5 जानेवारीला दुपारी 3:15 मिनिटांनी एमवी लीला नॉरफॉक जहाजाला इंटरसेप्ट केलं. INS चेन्नईवर तैनात असलेले मार्कोस कमांडोज लगेच एमवी लीला नॉरफॉकवर उतरले व त्यांनी आपल्या पद्धतीने ऑपरेशन सुरु केलं.
#IndianNavy’s Swift Response to the Hijacking Attempt of MV Lila Norfolk in the North Arabian Sea. All 21 crew (incl #15Indians) onboard safely evacuated from the citadel.
Sanitisation by MARCOs has confirmed absence of the hijackers.
The attempt of hijacking by the pirates… https://t.co/OvudB0A8VV pic.twitter.com/616q7avNjg
— SpokespersonNavy (@indiannavy) January 5, 2024
स्पेशल ऑपरेशन तीन व्हिडिओ
जहाजावरील तपासा दरम्यान एकही समुद्री डाकू आढळला नाही. भारतीय नौदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. इंडियन नेवीने माहिती दिली की, मरीन कमांडोजने सर्व 15 भारतीयांसह 21 सदस्यांचे प्राण वाचवलेत. जहाजाच्या तपासणी दरम्यान एकही डाकू सापडला नाही. कदाचित भारतीय नौदलाच्या इशाऱ्यानंतर समुद्री डाकूंनी आपला इरादा बदलला असेल. मार्कोस कमांडोजनी समुद्री डाकूंच्या तावडीतून या जहाजाच्या सुटकेसाठी कसे प्रयत्न केले, त्याचे तीन व्हिडिओ नौदलाने रिलीज केले आहेत.