भारत सरकार ज्या रशियन लसीच्या वापराला मंजुरी देणार आहे ती नेमकी कशी काम करते? वाचा सविस्तर
Sputnik V ही एस्ट्राजेनेका प्रमाणेच 2 डोस असणारी लस आहे. | vaccine sputnik v
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरु आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत देशातील विविध राज्यात लसीची कमतरता जाणवत आहे. अशावेळी केंद्र सरकारने सोमवारी रशियाच्या Sputnik V या कोरोना लसीच्या आत्पकालीन वापराला मंजुरी दिली आहे. ( How sputnik v work against coronavirus covid 19)
त्यामुळे आता भारतात आता कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर ही तिसरी लस उपलब्ध होणार आहे. Sputnik V ही एस्ट्राजेनेका प्रमाणेच 2 डोस असणारी लस आहे. गेमालेया रिसर्च इंन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी अॅन्ड मायक्रोबायोलॉजीने ही लस तयार केली आहे.
कशाप्रकारे काम करते Sputnik-V लस
Sputnik-V ही लस सर्वप्रथम शरीरातील एडेनो व्हायरस नष्ट करते. याच एडेनो व्हायरसमुळे सर्दी आणि खोकला होतो. हे विषाणू फारसे ताकदवान नसल्यामुळे शरीराला फारसे नुकसान होत नाही. या विषाणुंचे स्वरुप बदलण्याचीही शक्यता असते. कोरोनाची लस ही शरीरात गेल्यानंतर कोव्हिड व्हायरस स्पाईक प्रोटीन तयार करण्याच्या कामाला प्रारंभ करते. जेणेकरून जेव्हा कोरोना विषाणू शरीरावर हल्ला करेल तेव्हा हे स्पाईक्स त्याला प्रतिबंध करतील.
Sputnik V लस 91.6 टक्के परिणामकारक?
डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेनं गेल्या आठवड्यात भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने डॉ. रेड्डीसोबत सप्टेंबर 2020 मध्ये भारतात Sputnik V लसीची क्लिनिकल ट्रायल केली होती. Sputnik V च्या वेबसाईटनुसार ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. UAE, भारत, व्हेनेज्यूएला आणि बेलारुस इथं तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल केलं जात आहे.
RDIF ने लसनिर्मितीसाठी हैदराबादेतील डॉ. रेड्डीज प्रयोगशाळा, हेटेरो बायोफार्मा, ग्लँड फार्मा, स्टेलिस बायोफार्मा आणि विक्रो बायोटेक अशा भारतीय फार्मास्टुटिकल कंपन्यांसोबत करार केला होता. भारतात Sputnik V लसीचे 8.50 कोटी डोस बनवले जातील, असं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या:
ही घ्या संपूर्ण आकडेवारी, कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्या आणि किती लसी फुकट गेल्या?
रुग्ण बेडवर झोपल्याचा राग अनावर, दुसऱ्या रुग्णाकडून हत्या; यूपीतील धक्कादायक प्रकार
( How sputnik v work against coronavirus covid 19)