धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कसा मिळतो प्रवेश, पाहा काय आहेत निकष

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक मोठ्या लोकांची मुले शिकतात. अनेक खेळाडू, अभिनेते आणि उद्योगपतींची मुले या शाळेतच शिकतात. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी काय निकष आहे. या शाळेत प्रवेश कसा मिळवायचा जाणून घ्या.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कसा मिळतो प्रवेश, पाहा काय आहेत निकष
AMBANI SCHOOL
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 4:21 PM

मुंबई : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक सेलिब्रिटींचे मुले शिकतात. या शाळेची स्थापना रिलायन्स इंडस्ट्रीजने २००३ मध्ये केली होती. एलकेजी पासून ते बारावीपर्यंतचे शिक्षण या शाळेत घेता येते. अनेक क्रिकेटपटू आणि उद्योगपती यांची मुले धीरूभाई अबानी शाळेत शिकतात. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा जगातील टॉप 20 आणि भारतातील टॉप 10 शाळांमध्ये समावेश आहे. देशभरातील मुले येथे प्रवेशासाठी अर्ज करतात. मात्र मोजक्याच मुलांना प्रवेश मिळतो.

शाळेत प्रवेशाचे निकष

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी अनेक अटी आणि नियम आहेत. जन्मतारीख, प्रवेश मूल्यांकन, मुलाखत, मार्क आणि जागांची संख्या या आधारे या शाळेत प्रवेश दिला जातो.

एलकेजीमध्ये प्रवेश हवा असल्यास मुलगा 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता 8 वी मध्ये प्रवेशासाठी त्याने सातवीत चांगले गुण संपादित केलेले असावे तर 11वीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने चांगल्या मार्काने 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

प्रवेश प्रक्रिया कशी आहे

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ज्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर मुलांची निवड होते.

अर्ज कसा करावा?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या अधिकृत साईटवर भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर एक मेल येतो. अर्ज करताना पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज करण्यासाठी, 5000 रुपये निश्चित अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागते.

शाळेत कोणत्या सुविधा उपलब्ध

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक मोठ्या लोकांची मुले शिकतात. त्यामुळे येथे सुविधा ही तशाच दिल्या जातात. या शाळेच्या ग्रंथालयात सुमारे 40,000 पुस्तके आहेत. शाळेत एकूण 60 वर्गखोल्या आहेत. मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांसाठी 2.3 एकरचे मैदान आहे. या शिवाय शाळेत डिजीटल सुख सुविधा आहेत.

शाळेची फी किती आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलकेजी ते सातवीपर्यंतची वार्षिक फी एक लाख सत्तर हजार रुपये आहे. म्हणजेच महिन्याला 14 हजार रुपये. इयत्ता 8 वी ते 10 वी वार्षिक फी 1,85,000 रुपये इतकी आहे. इयत्ता 8 ते 10 साठी फी 5.9 लाख रुपये इतकी आहे. इयत्ता 11 आणि 12 वी साठी वार्षिक फी 9.65 लाख रुपये इतकी आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.