चीनची पुन्हा घुसखोरी, उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये 100 चिनी सैनिक शिरले आणि परतले, भारताच्या सैन्य संस्था अलर्टवर
चिनी सैनिक घुसखोरीनंतर काही तासांनी बाराहोटीहून चीनच्या सीमेत गेले. मात्र, परत जाताना त्यांनी भारतीय क्षेत्रातील काही पायाभूत सुविधांचंही नुकसान केलं आहे. या सैनिकांबरोबर 50 घोडे असल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली: चीनने पुन्हा एकदा भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) सुमारे 100 सैनिक गेल्या महिन्यात सीमेचे उल्लंघन करून उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये घुसल्याची माहिती आता मिळाली आहे. चिनी सैनिक घुसखोरीनंतर काही तासांनी बाराहोटीहून चीनच्या सीमेत गेले. मात्र, परत जाताना त्यांनी भारतीय क्षेत्रातील काही पायाभूत सुविधांचंही नुकसान केलं आहे. या सैनिकांबरोबर 50 घोडे असल्याची माहिती आहे. ( hundred-chinese-soldiers-infiltrated-in-uttarakhand barahat sector-after-eastern-ladakh-surveillance-has-been-increased-on-lac )
आधी चीन लष्कराने पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आणि या चकमकीत अनेक सैनिक मारले गेले. त्यानंतर चीनला माघार घ्यावी लागली. आता उत्तराखंडमध्ये चीनचं हे कारस्थान पाहून भारताची गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे आणि सीमा भागातील चौक्यांवर पाळत ठेवण्याचे प्रमाण वाढवण्यात आलं आहे. याआधी 30 ऑगस्ट रोजी सुमारे 100 चीनी सैनिक भारतीय सीमेमध्ये घुसले होते.
पूर्व लडाखच्या अनेक भागात छुप्या कारवाया
गलवानसारखी घटना पुन्हा होऊ नये म्हणून भारतीय सैन्याने या भागात गस्त वाढवली आहे. मात्र, चीनी सैनिकांच्या घुसखोरीबद्दल अद्याप सैन्याकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही. ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखच्या अनेक भागात संघर्ष सुरू आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद काहीसा थंडावला असतानाच, चीनकडून पुन्हा त्याला हवा देण्याचं काम सुरु झालं आहे. एका माहितीनुसार, हिवाळ्यात काहीतरी करण्याची चीनची तयारी आहे, त्यामुळेच LAC वर चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
भारताने LAC वर पाळत ठेवली
चीनच्या कारवाया पाहता, भारतीय लष्कर सीमेवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन तैनात करण्याची योजना आखत आहे, ज्यासाठी भारतीय लष्कराने आपल्या ताफ्यात नवीन इस्रायली आणि भारतीय ड्रोनचा समावेश केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील बाराहोटी सेक्टरमध्ये दोन्ही देश वेगवेगळ्या सीमा मानतात, त्यामुळे बऱ्याचदा तिथे सीमा पार करण्याच्या घटना घडत असतात. पण, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) पायाभूत सुविधांच्या विकासाची गती वाढवली आहे. त्यामुळेच भारताने पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर एलएसीवर पाळत ठेवली आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानातून आलो, ISI ने 20 हजार दिले, उरीमध्ये नाल्यात लपलो, जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे खुलासे
क्षुल्लक कारणासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 25 लाखांचा दंड भरण्याचे आदेश