AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बायकोच्या कमाईवर शिकला, अधिकारी बनला, नंतर तिलाच सोडून केलं दुसरं लग्न !

एसडीएम ज्योति मौर्यचे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच आता असंच पण एक नवं प्रकरण समोर आलं आहे. एका इसमाने पत्नीच्या पैशांवर उच्च शिक्षण पूर्ण केलं पण ऑफिसर बनल्यावर तो त्याच पत्नीची साथ सोडून पुढे गेला.

आधी बायकोच्या कमाईवर शिकला, अधिकारी बनला, नंतर तिलाच सोडून केलं दुसरं लग्न !
| Updated on: Jul 10, 2023 | 10:47 AM
Share

भोपाळ : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील महिला अधिकारी ज्योती मौर्य प्रकरणाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. एसडीएम झाल्यावर ज्योति मौर्य (jyotimaurya ) दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचा आरोप त्यांच्या पतीने केला होता. हे प्रकरण गाजत असतानाच आता असंच एक दुसरं प्रकरण समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील (madhya pradesh) ही घटना असून इथे फक्त महिलेऐवजी एका पुरूष आहे. ऑफिसर बनताच त्या पुरूषाने (husband left wife for another woman) पहिल्या पत्नीला सोडून दुसरा विवाह केल्याचा आरोप लावण्यात आहे.

दुसऱ्यांच्या घरी भांडी घासून पत्नीने केले पतीच्या शिक्षणासाठी सहाय्य

या इसमाच्या अभ्यासासाठी त्याच्या पत्नीने इतरांच्या घरी धुणी-भांडी केली, वेळप्रसंगी मजदूर म्हमूनही काम करून तिने पैसे कमावले. मात्र कमर्शिअल टॅक्स ऑफीसर बनल्यानंतर त्या पतीने पहिल्या पत्नीची साथ सोडून दुसरं लग्न केलं.

हे प्रकरण देवास जिल्ह्यातील बागली भागातील आहे. ममता नावाच्या महिलेचा विवाह कमरू याच्याशी झाला होता. दोघांनी जून 2015 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. कामरू पदवीधर होता, पण त्याला नोकरी मिळाली नव्हती. तेव्हा ममताने त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सांगितले. मात्र या परीक्षांचे फॉर्म आणि वह्या-पुस्तकांवर खर्च करण्यासाठी त्याच्याकडे पैस नव्हते, तेव्हा ममताने त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलली.

पतीच्या अभ्यासासाठी ममताने इतर घरांत काम केले, धुण्या-भांड्यांचीही कामं केली. दुकानात काम करून, मेहनत करून पैसे कमावले आणि पतीच्या शिक्षणासाठी पुस्तकं आणि नोट्स मागवल्या. त्याद्वारे कमरूने परीक्षेची तयारी सुरू केली.

2019-20 मध्ये पती बनला ऑफीसर

अखेर 2019-20 मध्ये कमरू यशस्वी झाले आणि कमर्शिअल टॅक्स ऑफीसरच्या पदावर त्यांची नियुक्ती झाली. कामासाठी ते रतलाम जिल्ह्यात होते. मात्र त्याचदरम्यान, त्यांचा जोबात येथील एका तरुणीशी संपर्क झाला आणि त्यानंतर कमरूने ममताला तिच्या माहेरी पाठवले आणि तो दुसऱ्या महिलेसोबत राहू लागला.

ममताच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिची कमरूशी ओळख झाली होती. दोघेही जवळपास सहा वर्षे एकत्र राहिले. तिचे पहिले लग्न 16 वर्षांपूर्वी झाले होते. मात्र लग्नाच्या अडीच वर्षानंतरच पतीचा मृत्यू झाला होता. तिला पहिल्या पतीपासून मुलगा झाला, पण काही महिन्यांपूर्वी तिचा 15 वर्षांचा मुलगाही मरण पावला. कामरू हा तिचा सासरकडचाच नातेवाईक होता. पतीनिधनानंतर सासरी रहात असतानाच ममता व कमरूची ओळख झाली व दोघांमध्ये प्रेम फुलले.

त्यावेली कमरू हा शिक्षण घेता होता. तो खूप मेहनत करत असे, पण नोकरी लागल्यावर, मोठ्या पदावर नियुक्ती झाल्यावर तो बदलला आणि जिच्यामुळे हे सगळं शक्य झालं त्या पहिल्या पत्नीला सोडून त्याने दुसरं लग्न केलं. या सर्व घटनेमुळे दु:खी झालेली ममता सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत असून याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. पोटगीसाठी दरमहा 12 हजार रुपये मिळावेत अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे.

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.