HYBRID WORKING MODEL: ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ऑफिस नाही, टॉप-3 आयटी कंपन्यांचा ‘हा’ निर्णय

कंपनी आणि कर्मचारी दोघांचा वर्क फ्रॉम होमकडे अधिक कल पाहायला मिळत आहे. वर्क फ्रॉम होम कार्यपद्धतीचा अवलंब भारतासहित जगभरातील राष्ट्रांनी केला. देशातील आयटी क्षेत्रातील अग्रणी मानल्या जाणाऱ्या एचसीएल, इन्फोसिस आणि टीसीएस यांनी नेमकं कोणतं धोरण अवलंबल याविषयी माहिती जाणून घेऊया...

HYBRID WORKING MODEL: ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ऑफिस नाही, टॉप-3 आयटी कंपन्यांचा ‘हा’ निर्णय
वर्क फ्रॉम होमImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 11:52 PM

नवी दिल्ली : कोविड प्रकोपाच्या काळात जगभरातील कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा (Work From Home) पर्याय अवलंबला. देशभरातील प्रमुख कंपन्यांनी कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होमला पसंती दर्शविली आहे. तर काही कंपन्यांनी हायब्रीड मॉडेलचा (Working Hybrid Model) मार्ग अवलंबला आहे. कर्मचाऱ्यांना आठवड्यातील किंवा महिन्यातील काही दिवस घरातून आणि उर्वरित दिवस ऑफिसमधून काम करण्याची मुभा असेल. दरम्यान, कंपनी आणि कर्मचारी दोघांचा वर्क फ्रॉम होमकडे अधिक कल पाहायला मिळत आहे. वर्क फ्रॉम होम कार्यपद्धतीचा अवलंब भारतासहित जगभरातील राष्ट्रांनी केला. देशातील आयटी क्षेत्रातील अग्रणी मानल्या जाणाऱ्या एचसीएल, इन्फोसिस (INFOSYS) आणि टीसीएस यांनी नेमकं कोणतं धोरण अवलंबल याविषयी माहिती जाणून घेऊया

टीसीएस

आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांत टीसीएसचं नाव समाविष्ट आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कोविड काळात अस्थायी स्वरुपाचं धोरण म्हणून वर्क फ्रॉम होमचा स्विकार करण्यात आल्याचं म्हटलयं. दरम्यान, दीर्घ काळासाठी वर्क फ्रॉम होम धोरण आखण्याची गरज असल्याच्या मानसिकतेत कंपनी व्यवस्थापन आलं आहे. कंपनीनं यापूर्वीच हायब्रीड कामाचं धोरण स्विकारलं आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना आठवड्यातील काही दिवस प्रत्यक्ष ऑफिसमधून आणि उर्वरित दिवशी घरुन काम करण्याची मुभा असेल. कंपनीच्या एकूण संख्येच्या 25% कर्मचारीच केवळ ऑफिसमधून काम करण्याचा निर्णय टीसीएसनं घेतला आहे. मात्र, आगामी काळात टीसीएसचं धोरण नेमकं कसं राहिल याविषयी उत्सुकता आहे.

इन्फोसिस

इन्फोसिसनं हायब्रीड मॉडेलचा पर्याय निवडला आहे. कंपनीनं पहिल्या टप्प्यात डेव्हलपमेंट सेंटर्स नजीक राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील दोन दिवस ऑफिसमध्ये काम करण्यास सूचना दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात कंपनी अधिक अंतरावरील कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यासाठी सूचित करणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपनी हायब्रिड मॉडेलचा स्विकार करणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना विशिष्ट दिवस ऑफिस व घर अशा दोन्ही ठिकाणी कामाची आखणी करावी लागेल.

हे सुद्धा वाचा

एचसीएलचं काय चाललंय?

एचसीएलनं कर्मचारी आणि कुटुंबाचं आयुष्य सर्वोच्च असल्याचं म्हटलं आहे.तसेच क्लायटंला सेवा देण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकडे देखील एचसीएलनं विशेष लक्ष दिलं आहे. अन्य दोन कंपन्यांसोबतच एचसीएलनं हायब्रिड मॉडेलचा स्विकार केला आहे. पूर्णवेळ कार्यालयापेक्षा हायब्रिड मॉडेल कंपन्यांच्या पसंतीस उतरल्याचं चित्र आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.