चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला

संपूर्ण देशात 4जी आणि 5जी इंटरनेट असताना काश्मीरमध्ये अजूनही 2जी इंटरनेट आहे. मग येथील तरुणांची प्रगती कशी होणार?

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 6:27 PM

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये चीनच्या मदतीने अनुच्छेद 370 पुन्हा लागू करण्याविषयी आम्ही आशावादी असल्याचे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए रद्द करण्यास फारुख अब्दुल्ला यांचा विरोध होता. केंद्र सरकारने अध्यादेश काढून अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांना बराच काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. (Farooq Abdullah on article 370 in Kashmir)

काही दिवसांपूर्वीच त्यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली होती. यानंतरही फारुख अब्दुल्ला यांनी अनुच्छेद 370 आणि अनुच्छेद 35 ए चे समर्थन करणे सुरुच ठेवले आहे. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० आणि अनुच्छेद 35 ए पुन्हा लागू करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आम्हाला चर्चेसाठी वेळ देण्यातच आली नाही. देशातील लोकांना वास्तव समजले पाहिजे. काश्मीरमधील नागरिक कशाप्रकारे राहतात आणि येथील स्थिती काय आहे, हे त्यांना कळायला पाहिजे. देशाच्या इतर भागांप्रमाणे काश्मीरचा विकास होतोय की हा प्रदेश मागे पडलाय, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे.

काश्मीरमधील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. संपूर्ण देशात 4जी आणि 5जी इंटरनेट असताना काश्मीरमध्ये अजूनही 2जी इंटरनेट आहे. मग येथील तरुणांची प्रगती कशी होणार? देशात इतरत्र मिळणाऱ्या सुविधा येथील लोकांना का मिळत नाहीत? अशाने आम्ही लोक पुढे कसे जाणार? काळ बदलला आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी संसदेच्या अधिवेशनावेळी म्हटले होते.

तसेच भारत आणि पाकिस्तान यांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संवाद कायम ठेवावा, असा फारुख अब्दुल्लांचा आग्रह आहे. ज्याप्रकारे आपण चीनशी चर्चा करतो तशीच पाकिस्तानशीही करावी, असे अब्दुल्लांचे म्हणणे आहे. काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणावर गरिबी आहे. येथील लोकांकडे रोजगार नाही. कदाचित यामुळे भविष्यात असे वादळ येईल की, ते रोखणे अशक्य असेल, असा इशाराही मध्यंतरी फारुख अब्दुल्ला यांनी दिला होता.

संबंधित बातम्या: हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करण्याचं जाहीरनाम्यात सांगा, मोदींचं विरोधकांना आवाहन

भाजपचा महाराष्ट्रात कलम 370 च्या नावे मतांचा ‘जोगवा’, नेटकऱ्यांचा नेत्यांवर संताप

स्पेशल रिपोर्ट : शालेय अभ्यासक्रमातही कलम 370 चा समावेश होणार

(Farooq Abdullah on article 370 in Kashmir)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.