कोरोनाची औषधं आणि लसीवर जीएसटी कर गरजेचा, अन्यथा किंमत वाढेल: निर्मला सीतारामन

ममता बॅनर्जी यांनी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. | GST Coronavirus vaccine

कोरोनाची औषधं आणि लसीवर जीएसटी कर गरजेचा, अन्यथा किंमत वाढेल: निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 8:16 AM

नवी दिल्ली: कोरोनासाठीच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधे आणि लसीवर (Covid vaccine) वस्तू व सेवा कर (GST) लावणे गरजेचे आहे. औषधे आणि लसींवरील जीएसटी रद्द झाला तर दोन्हींची किंमत वाढेल, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केले. (GST on vaccines in the interest of citizens must to keep rates low FM Nirmala Sitharaman)

जीएसटीमुळे लस उत्पादकांना त्यांच्या कराचा परतावा (इनपुट क्रेडिट टॅक्स) मिळतो. त्यामुळे कोरोनाची औषधे आणि लसीची किंमत कमी ठेवता येते. मात्र, लस आणि औषधांवरील जीएसटी पूर्णपणे उठवला तर लस उत्पादकांना त्यांच्या कराचा परतावा मिळणार नाही. परिणामी ते आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवताना त्यांची किंमत वाढवतील, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी कोरोनाशी संबंधित औषधांवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. निर्मला सीतारामन यांनी रविवारी दिल्लीत झालेल्या पत्रकारपरिषदेत यावर स्पष्टीकरण दिले.

कोरोना लसीवर आकारण्यात येणाऱ्या 5 टक्के जीएसटीमुळे उत्पादकांना त्यांचा कर परतावा वसूल करता येतो. कर परतावा नियोजित मर्यादेच्या पलीकडे गेल्यास कर परताव्याचा दावाही करता येतो. त्यामुळे लस किंवा कोरोना औषधांवरील जीएसटी रद्द केल्यास त्याचा ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होईल, असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

सध्या लस आणि औषधांवर किती टक्के जीएसटी?

सध्या देशांतर्गत उत्पादित लशी आणि त्यांच्या व्यावसायिक आयातीवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो, तर करोना औषधे आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांच्यावर 12 टक्के जीएसटी वसूल केला जातो. लशींवर आकारलेल्या 5 टक्के जीएसटीचा निम्मा वाटा केंद्राला आणि निम्मा वाटा राज्याला मिळतो. केंद्राच्या वाटय़ातील 41 टक्के वाटा पुन्हा राज्यांना दिला जातो. याचा अर्थ लशींवरील जीएसटीद्वारे केंद्राला मिळालेल्या महसुलापैकी जवळपास 70 टक्के महसूल राज्यांना मिळतो, असेही सीतारामन यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे 10 लाख लोकांचा मृत्यू; लॅन्सेटचा गंभीर इशारा

तुरुंगातही कोरोना संसर्गाची भीती वाढली, मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी, आरोग्य मंत्री राजीनामा द्या; चिदंबरम यांची मागणी

(GST on vaccines in the interest of citizens must to keep rates low FM Nirmala Sitharaman)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.